धुळे : महिलेला संमोहित करुन 35 ग्रँम सोन्याची चेन चोरट्यांनी धुम स्टाईलने लुटली

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळ्यात तिसऱ्याच दिवशी परत एकदा चोरट्यांनी सकाळीच संधी साधत 35 तोळे सोने लंपास केले. शहरातील देवपुर परिसर पंचवटीतील महादेव मंदिरा जवळ दोन अज्ञात चोरटे मोटरसायकलवर आले. मंदिरातील पुजारीच्या पत्नीला सांगितले की आम्हाला दान करायचे आहे.

आमचे जवळ कमी वेळ आहे. पुजारी कुठे आहे. त्यांचे जवळील पैसे हि दाखवले. व काही क्षणात महिलेवर संमोहन केले महिला घरात गेली तिचे जवळील दागिने तिने घरातून आणून चोरट्यांना दिले. चोरट्यांनी रुमालात बांधलेले फुले त्यांना दिली. व सांगितले की यात दागिने आहेत. मंदिरात तुम्ही दान पेटीत टाकुन द्या असे सांगितले व चोरटे मोटरसायकलने दागिने घेऊन पसार झाले.

महिला मंदिरात गेल्यानंतर जवळील रुमाल उघडला त्यावेळी रुमालात फुले निघाली आपली फसवणुक झाली हे महिलेच्या लक्षात आले. नंतर लगेचच महिलेने आरडाओरड केली. कोणी मदतीसाठी पुढे धावून आले नाही. सतत वाढत्या घटनामुळे महिला वर्गात पोलीसांवरील विश्वास उडत चालेला आहे. अशी चर्चा परिसरात रंगली होती.

हि घटना घडली तेथून हाकेच्या अंतरावर देवपुर पोलीस स्टेशन आहे. पोलीसांचा चोरट्यावर वचक राहिला नाही. सुनंदा मोहन गोसावी. वय.60 यांनी देवपुर पोलीस ठाणे गाठत सोने चोरी बाबत लेखी तक्रार दिली आहे. उशीरा पर्यत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी