रांजणगाव पोलिसांनी केल्या दोन चोरांकडून सात दुचाकी हस्तगत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेले काहि दिवसापासून शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव, शिक्रापुर परिसरात दुचाकी चोरीच्या सञात मोठी वाढ झाली असतानाच रांजणगाव पोलिसांनी शिरुर येथील दोन चोरट्यांना रांजणगाव एमआयडीसी परिसरात सापळा रचून अटक केले.

रांणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल विठ्ठल वेताळ व आकाश बबन चित्तर राहणार शिरुर हे मोटार सायकल चोरी करण्यासाठी रांजणगाव एमआयडीसी येथे येणार आहे. पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना अटक केले. दोन्हीकडून शिक्रापुर आणि रांजणगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असलेल्या दोन दोन मोटार सायकली तर एकूण सात मोटार सायकली हस्तगत केला आहेत. त्याची अजून कसून चौकशी सुरू असून शिक्रापुर, रांजणगाव, शिरुर पोलिस स्टेशन हद्दीतील अजून चोरीस गेलेल्या मोटार सायकली हस्तगत होण्याची शक्यता आहे. यावेळी रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले की रांजणगाव एमआयडीसीतील कामगार वर्गाने कंपनीमध्ये कामाला येताना मोटार सायकल कंपनीचे आतिल पार्किंग मध्ये पार्क कराव्यात. तसेच राञीच्या वेळी मोटार सायकल सुरक्षित पार्क कराव्यात.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक संदिप पाटिल अप्पर पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्या आदेशाने उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव चे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकातील सपोनि प्रफुल्ल कदम, तुषार पंदारे, अनिल भुजबळ, मंगेश थिंगळे यांच्या पथकांने केली.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like