महापालिकेच्या महागड्या लोखंडी जाळ्या चोरणारा गजाआड

खडक पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिकेच्या भुयारी मार्गातील महागड्या लोखंडी जाळ्या चोरणाऱ्या चोरट्याला खडक पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून नऊ लोखंडी जाळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई विजयसिंह घोरडपडे उद्यान येथे करण्यात आली आहे.

विनोद बापु पाटोळे (वय-२२ रा. जनता वसाहत, पर्वती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पाटोळे याच्यावर २०१६ साली वाहनचोरीचा गुन्हा खडक पोलीस ठाण्यात दाखल आहे. पंधरा दिवसांपूर्वी वेगा सेंटरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या भुयारी मार्गातील ९६ हजार रुपयांच्या लोखंडी जाळ्या चोरीला गेल्या होत्या. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस कर्मचारी रवी लोखंडे व विनोद जाधव यांना लोखंडी जाळ्या चोरणारा विजयसिंह घोरपडे उद्यानाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून पाटोळेला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पाटोळे याने चोरलेल्या जाळ्या घोरपडे पेठेतील एका कंपनीच्या जवळील सार्वजनीक शौचालयाजवळील कचऱ्यात लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी नऊ जाळ्या जप्त केल्या आहेत.

ही कारवाई पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम चक्रे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, पोलीस कर्मचारी विठ्ठल पाटील, विनोद जाधव, संदिप पाटील, रवि लोखंडे, आशिष जाधव, विशाल जाधव, इम्रान नदाफ, सागर कोकाण, हिम्मत होळकर यांच्या पथकाने केली.