Solapur News : 2 अट्टल आरोपींना सोलापूर पोलिसांनी पकडलं !

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आंध्र प्रदेशातील यम्मारपल्ली पोलीस ठाणे (जि. तिरुपती) हद्दीत घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत डी बी पथकानं अटक केली असून दोघांना आंध्र प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

नागराजू सत्यनारायण जक्कमशेट्टी (वय 33 रा. पेदवारुगद्द, पेनुमंड्रा, जि. पश्चिम गोदावरी, राज्य आंध्र प्रदेश) भोला भीमाराव नागसाई (वय 30, रा. सिन्नागिरी कॉलनी, गाजावाका जि. विझाग, विशाखापट्टणम राज्य आंध्रप्रदेश) असं अटक करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांची नावं आहेत. दोघांना पकडण्यासाठी आंध्र प्रदेश पोलीस गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करत होते. दोघं सोलापूर येथे येत जात असल्याची माहिती तिरुपती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळं ते गेल्या एका महिन्यापासून पकडण्याचा प्रयत्न करीत होते. आंध्र प्रदेश पोलिसांनी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे नमूद आरोपींना पकडण्यासाठी मदत मागितली. होती.

सोमवारी तिरुपती क्राईम ब्रांच अधिकारी कर्मचारी व विजापूर नाका पोलीस ठाणेकडील डी बी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सोरेगांच येथे सापळा रचला आणि मोठ्या शिताफिनं त्यांना पकडलं. दोघांनी आजपर्यंत 40 गुन्हे केल्याचं त्यांनी कबूल केलं. एकूण 1 किलो 600 ग्रॅम सोनं, 5 किलो 100 ग्रॅम चांदी, 3 लाख 4 हजार रोख रक्कम चोरल्याची कबुलीही त्यांनी दिली.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर, सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंग पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, डी बी पथकातील सहायक फौजदार संजय मोरे, हवालदार श्रीरंग खांडेकर, राजकुमार तोळनुरे, शावरसिद्ध नरोटे, प्रकाश निकम, पोलीस कॉन्स्टेबल इम्रान जमादार, आलम बिराजदार, बालाजी जाधव, उदयसिंह साळुंके, विशाल बोराडे, लक्ष्मण वसेकर, अनिल गवसाने, अतिश पाटील, शिवानंद भिमदे, तरुपती क्राईम ब्रांचचे पलीस निरीक्षक मोहनप्रसाद, रवी प्रकाश, नागराज विनायक, राजकुमार, नागराज वर्गरे यांनी ही कामगिरी केली.