१ लाख ५ हजाराच्या लोखंडी रिंगा चोरणार्‍या ३ आरोपींना पोलिसांकडून अटक

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन – टिळेकरवाडी (ता. हवेली ) येथील सिमेंटच्या कारखान्यातील सिमेंटचे पाइप तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या एक लाख पाच हजार रूपयांच्या लोखंडी रिंगा चोरनार्‍या तीन आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली असून त्यांचा एक साथीदार अद्यापही फरार आहे.

सचिन दत्तात्रय चव्हाण (वय- २९ ), व अक्षय रामदास चव्हाण (वय- २२ रा. दहिटणे ता. दौंड ) सुनील अंकुश माकर (वय-३० रा. हिंगणगाव ता. हवेली ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत तर संदीप राजेंद्र जाधव (रा. दहिटणे ता. दौंड) हा अद्यापही फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, टिळेकरवाडी येथे अमित अनंतराव राऊत यांची सिमेंटचे पाईप तयार करण्याचा कारखाना आहे. कामगारांना सुट्टी असल्या कारणामुळे कारखाना ३ ते ५ मे या दिवशी बंद ठेवण्यात आला होता. यावेळी अज्ञात चोरट्यांनी एक लाख पाच हजार रुपये किमतीच्या लोखंडी रिंगा चोरून नेल्याची तक्रार लोणी काळभोर पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गावातील सी. सी. टी. कॅमेर्‍याच्या फुटेजच्या सहाहयाने आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान आरोपींची अधिक चौकशी केली असता दोन मोटर सायकलवरुण सदरच्या रिंगा चोरून नेल्याची कबुली दिली आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी सत्तावन्न हजार सहाशे रुपये किमतीच्या पाइप तयार करण्याच्या लोखंडी रिंगा व एक दुचाकी गाडी त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई ऊरुळी कांचन दूरक्षेत्राचे पोलिस निरीक्षक गणेश उगले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलिस हवालदार श्रीपती कोलते, सोमनाथ चितारे, सचिन पवार, अमोल भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.