महागडे ९० कुलर चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ताथवडे येथील गोदामामधून सिंपनी कंपनीचे ९० महागडे कुलर चोरी करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ८६ कुलर आणि गुन्ह्यात वापरलेला ट्रक जप्त केला आहे. आरोपीनी गुन्हा करताना अंगात घातलेल्या बनियन वरुन गुन्ह्याचा छडा लावण्यात आला आहे.

योगेश बाबाजी पुतमाळी (२३, रा. माळीवाडी, औरंगाबाद), अजीज बादशहा सय्यद (४८, रा. भारतनगर, औरंगाबाद) आणि ज्ञानेश्वर रामराव पल्हाळ (२३, रा. पवननगर, औरंगाबाद) या तिघांना अटक केली आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ताथवडे येथील रघुनंदन मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या डिजीवन स्नेहाजली रिटेल प्रायव्हेट कंपनीच्या गोदामाचे शटर उचकटून ९० कुलर ट्रक मध्ये भरुन नेले.

चोरट्यांची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. औरंगाबाद, वाळुंज परिसरात राहणाऱ्या चोरट्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १० लाख रुपयांच्या ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक केलेले आरोपी सराईत असून त्यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर.के. पदमानाभन, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाचे उपनिरीक्षक हरिष माने, सिद्धनाथ बाबर, बापू धुमाळ, नितीन ढोरजे, जावेद पठाण, भेरोबा यादव, शाम बाबा, नितीन गेंगजे, रमेश गायकवाड या पथकाने केली.

You might also like