चालकांना लुटणारे गजाआड ; २७ लाखाचा मुद्देमाल जप्त

भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन – दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात मालासह चोरून नेलेले ट्रक आणि टेम्पो भोसरी एमआयडीसी पोलिसांनी २४ तासात जप्त केले आहेत. याप्रकरणी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून २७ लाख १७ हजार ४२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अमेझॉन कंपनीचा माल घेऊन जाणाऱ्या टेम्पो (एमएच ४३ एडी १५५९) चालकाकडून जबरदस्तीने टेम्पो पळवून नेणाऱ्या दोघांना भोसरी एमआयडीसी पोलिसांनी २४ तासात अटक केली. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हा प्रकार गुरुवारी (दि.२०) घडला होता. याप्रकरणी टेम्पो चालक त्रिवेणी धुषधारी यादव (वय-२८ रा. नेहरुनगर पिंपरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

याप्रकरणी पोलिसांनी अशोक उर्फ बापु प्रभु शेडगे (वय-३४ रा. मोरे वस्ती, चिखली) आणि अश्विन अशोक पवार (वय-२७ रा. म्हेत्रे पुल, दत्तवाडी, पुणे) यांना बर्ड व्हॅली समोरून अटक केली. त्यांच्याकडून अॅमेझॉन कंपनीच्या माल आणि ट्रक असा एकूण १० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी त्रिवेणी यादव यांच्याकडून जबरदस्तीने टेम्पो घेऊन निगडीच्या दिशेने पळून गेले होते. एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपींनी अटक केली.

दुसऱ्या घटनेत रामराजे संदिपान जगदाळे (वय-२७ रा. कुदळवाडी चिखली) हे टाटा कंपनीचे स्प्रिंग लिफ (पाटे) घेऊन जात होते. त्यावेळी फायनान्सचे कर्ज असल्याचे सांगून दोन चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातून जबरदस्तीने ट्रक घेऊन फरार झाले होते. हा प्रकार गुरुवारी (दि.२०) मोशी ते कांदा मार्केट दरम्यान घडला होता. या गुन्ह्याचा तपास करून राहुल जयहिंद गर्जे (वय-२५ रा. काटेवस्ती, चऱ्होली) आणि विश्वजित राजेश शिंदे (वय-२३ रा. घरकुल चिखली) या दोघांना शिवापूर टोलनाका येथून अटक केली. त्यांच्याकडून १६ लाख ६७ हजार ४२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकाच दिवशी झालेल्या दोन चोरीच्या घटनांचा २४ तासात तपास करुन चार आरोपींना अटक केली.

ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त पिरमंडळ -१ स्मार्तना पाटील, पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राम जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सतीश नांदुरक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रावसाहेब बांबळे, श्रीकांत शेंडगे, पोलीस हवालदार रविंद्र तिटकारे, पोलीस नाईक दिपक महाजन, पोलीस शिपाई विजय दौंडकर, नवनाथ पोटे, करन विश्वासे, सुभाष भांबुरे, रहिम शेख, अनिल जोशी, अमोल निघोट, विशाल काळे यांच्या पथकाने केली.

सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

पतिला सोडून अभिनेत्री जेनिफर विगेंट राहते आता ‘या’ अभिनेत्यासोबत

‘या’५ अभिनेत्रीच्या ‘सिंदूर’ लुकची ‘कमाल’ ; दिसतात ‘सुंदर’ आणि ‘संस्कारी’

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’