जबरी चोऱ्या करणाऱ्या ‘त्या’ टोळीला पोलीसांनी केले जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जबरी चोऱ्या व घरफोडी करणाऱ्या चार जणांच्या सराईत टोळीला चाकण पोलिसांनी बस स्थानकावर सापळा रचून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून १५ मोबाईल व दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. आरोपींवर यापूर्वी चाकण पोलीस ठाण्यात एकूण पाच जबरी चोऱ्या व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय संदीप चव्हाण (वय २२), पवन नामदेव एकशिंगे (वय २२), विश्वजित बाबूराव लोंढे (वय १९) व शुभम ज्ञानदेव शेटे (वय १९, सर्व रा. घरकुलसोसायटी, चिखली, ता. हवेली, जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

आरोपी हे चाकण एसटी बस स्थानकावर येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विक्रम पासलकर व त्यांच्या पथकाने बस स्थानकावर सापळा रचून दोन मोटारसायकलवरून आलेल्या या चार आरोपींवर झडप घातली. त्यांच्याकडून चोरी केलेले विओ, ओपो, सॅमसंग आदी कंपन्यांचे महागडे १५ मोबाईल व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा १ लाख ४६ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे

हार्ट अटॅक अनेकदा सकाळीच का येतो? बचावाचे उपाय

‘हे’ चिमूटभर नैसर्गिक ‘माऊथ फ्रेशनर’ खा, होतील अनेक फायदे