चाकुचा धाक दाखवून चोरी करणारे गजाआड

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन –  सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखून इलेक्ट्रोनिक्सच्या वस्तू चोरून नेणाऱ्या चार जणांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई नुकतीच करण्यात आली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d57b02c6-d2cc-11e8-b6a6-a5b555b645f8′]

संतोष काळुराम चव्हाण (वय-२६ रा.कोंढवा कमेला झोपडपट्टी, कोंढवा पुणे) रफिक जुम्मन शेख रा. मूळ-कलकत्ता) अविनाश तारकेसर पाल (रा. कृष्णा नगर, महमदवाडी, पुणे) मुक्तार हाशु शेख रा.साळुखे विहार रोड, केदारी नगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमधून सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून १ लाख ६८ हजार रुपये किंमतीच्या वस्तू चोरुन नेल्या होत्या. या गुन्ह्याची नोंद कोंढवा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस नाईक संजीव कलंबे यांनी तांत्रिक विश्लेशनाची माहिती घेऊन आरोपींना अटक केली. आरोपींकडून १ लाख ४८ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

‘मुंडे साहेबांच्या पश्चातही मला त्रास’ – पंकजा मुंडे

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रविंद्र सेनगावकर, परिमंडळ -५ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक नितीन बोधे, पोलीस हवालदार ईकबाल शेख, शरद नवले, सचिन शिंदे, पोलीस नाईक जयंत चव्हाण, संजीव कलंबे, पोलीस शिपाई आदर्श चव्हाण, जगदीश पाटील, दिपक क्षिरसागर, प्रशांत कांबळे, उमेश शेलार यांच्या पथकाने केली आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’076c0bf0-d2cd-11e8-882b-d32fdcdc4df2′]