एटीएम सेंटर फोडताना चोरट्याला रंगेहाथ अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांना परतीच्या वाटेवर एटीएम सेंटरमध्ये चोरी करणारे चोरटे रंगेहाथ सापडले. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका चोरट्याला पाठलाग करुन पकडण्यात आले. ही कारवाई आज (मंगळवार) पहाटे तीनच्या सुमारास नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चाकण येथे करण्यात आली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’83331618-cbc1-11e8-8659-ef149b70e840′]

चेतन शिवाजी राऊत (वय-२५ रा. चाकण, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

एका गुन्ह्यातील आरोपी चाकण येथे असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ समीर शेख यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम व दरोडा प्रतिबंधक पथकातील कर्मचारी चाकण येथे गेले होते. आरोपीचा शोध घेऊन परत येत असताना पहाटे तीनच्या सुमरास चाकण येथील अॅक्सीस बँकेच्या एटीएम सेंटरमधून काहीजण तोंडाला रुमाल बांधून बाहेर पळताना दिसले.
[amazon_link asins=’B078M16N8P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’883ee5b6-cbc1-11e8-a445-f9e2ba3b427d’]

त्याचवेळी ग्राम सुरक्षा दलाचे दिनेश सांगडे, प्रकास ढोले, दिपक कुमार हे एका चोरट्याच्या मागे धावले. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस हवालदार अजय थोरात, पोलीस नाईक वैभव स्वामी, पोलीस नाईक सचिन गायकवाड धनाजी पाटील यांनी दुसऱ्या चोरट्याचा पाठलाग करुन पकडले.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8dfd3bdc-cbc1-11e8-aff9-91bd38bf47d4′]

आरोपीकडे चेतन राऊत याच्याकडे चौकशी केली असता त्याने इतर साथिदारांच्या मदतीने अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडल्याचे सांगितले. दरम्यान, चाकण पोलिसांचे गस्तीवर असलेले एक पथक त्या ठिकाणी आले. चाकण पोलीस ठाण्यात पोलीस उप निरीक्षक व्ही. सी.पासलकर व पोलीस शिपाई खेडकर यांनी एटीएमची तपासणी केली. तपासणीमध्ये एटीएम पहारीच्या सहाय्याने फोडल्याचे दिसले. तसेच एटीएम बाहेर एक दुचाकी व रंगाचा स्प्रे मिळाला. पोलिसांनी दुचाकी आणि स्प्रे जप्त केला. कायदेशीर कारवाई करुन दरोडा प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या चोरट्याला चाकण पोलिसांच्या ताब्यात दिले.