काय सांगता ! होय, 5 लाखाचं सामान सोडून चोर फक्त 167 रूपये घेवुन गेला

गोरखपुर : वृत्तसंस्था – एका प्रोव्हिजन स्टोअरमधील पाच लाख रुपयांचे सामान सोडून एक चोर 167 रुपये चोरी करून गेला आहे. सदर घटना गोरखपुरच्या भगत चौकाजवळील सत्यम प्रोव्हिजन स्टोअरमध्ये घडली आहे. चोरट्याने चोरी केलेल्या रकमेपेक्षा स्टोअरमालक लॉक तोडण्यामुळे झालेल्या नुकसानाची चिंतीत आहे.

चोर शटर तोडून दुकानात घुसला आणि 167 रुपये घेऊन निघून गेला. स्टोअर असणाऱ्या मनुका, काजू सारख्या वस्तूंना स्पर्शही केला नाही. सोमवारी सकाळी मालक स्टोअर उघडण्यासाठी आले असता शटर तुटलेले पाहून ते हैराण झाले. केवळ 167 रुपयांच्या चोरीसाठी चोराने लॉक व शटर तोडले त्याची किंमत 800 रुपये आहे.

दररोज प्रमाणेच रविवारी रात्री दुकान मालकाने स्टोअर बंद केले. सोमवारी सकाळी दुकान फुटल्याची माहिती एका शेजाऱ्याने त्यांना दिली. मालकाने स्टोअरमध्ये जाऊन पहिले असता इतर सामानाला चोराने धक्काही न लावता 167 रुपये चोरी केली असल्याचे निदर्शनास आले. खबरदारी म्हणून त्यांनी पोलिसांना माहिती घटनेची दिली मात्र या चोरीविषयी तक्रार दिली नाही.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like