पोलीस निरीक्षकाच्या घरात चोरट्याचा डल्ला

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – ठाणे आयुक्तालयामध्ये पोलीस निरीक्षक पदावर कार्य़रत असणारे अनिल वाघमारे यांच्या घरामध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघकीस आला आहे. अनिल वाघमारे हे मूळचे सातारचे असून ते सुट्टीवर आले होते. मंगळवारी पहाटे संतोष पवार या चोरट्याने वाघमारे यांच्या वडीलांचे पैसे चोरत वडिलांकडे आणखी पैशांची मागणी केली.

हा प्रकार अनिल वाघमारे यांना समजल्यानंतर त्यांनी स्वत: सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

संतोष पवार हा केबल व्यवसायिक असून तो सुरुवातीला अनिल वाघमारे यांच्या आई- वडिलांची इतर कामे करत होता. मात्र त्याला दारुचे व्यसन असल्याने त्याला इतर कामे सांगणे बंद केले होते. १९ फेब्रुवारी रोजी अनिल वाघमारे हे संगमनगर येथील घरात होते. त्यादिवशी वडील बाहेरच्या खोलीत ते आले असता त्याठिकाणी संतोष पवार हा आला होता. गोपाळराम यांनी त्याला हटकले असता तो त्यांच्या पाकिटातील ५०० रुपये काढत होता. पैसे काढून त्याने खिशात ठेवले व आणखी पैशांची मागणी करु लागला. वादावादी झाल्याने गोपाळराम यांचा दुसरा मुलगाही झोपेतून उठला.

याबाबतची माहिती अनिल वाघमारे यांना दिल्यानंतर ते घरी आले. वडिलांकडून माहिती घेतली त्यावेळी संशयित संतोष पवार हा वेळोवेळी केबल व्यतिरीक्त इतर पैशांची मागणी करत होता.  यामुळे स्वत: अनिल वाघमारे यांनी शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.