बिअरच्या टेम्पोवर चोरट्यांचा डल्ला

वाशीः पोलीसनामा आॅनलाईन

संदीप बारकुलः

बिअरची वाहतूक करणाऱ्या धावत्या टेम्पोवर चोरट्यांनी डल्ला मारत बिअरचे बाॅक्स लंपास केल्याची घटना सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी मध्यरात्री वाशी फाटा या ठिकाणी घडली आहे.

एम .पी .09 जीएम 4199 क्रमांक असलेला आयशर टेम्पो बिअर चे बॉक्स घेऊन सोलापूरकडे निघाला होता. त्यावेळी मध्यरात्री वाशी फाट्याजवळ धावत्या टेम्पोवर मागील बाजूने चढून पाठीमागील ताडपत्री फाडून चोरट्यानी बियरचे बॉक्स लंपास केले त्यामध्ये एकूण 25 बॉक्स लंपास केले असून, त्याची किंमत 16 हजार 250 रुपये आहे. टेम्पो चालक इसाकखान कालेखान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे