इंदापुरात गजबजलेल्या चौकातील दोन दुकाने चोरट्यांनी फोडली

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन

सुधाकर बोराटे

इंदापूर शहरातील जुना पूणे सोलापूर हायवे लगत गजबजलेल्या लोकवस्ती चौकातील शिवलिला मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्स व चेतन फोटो स्टुडिओ ही दोन दुकाने अज्ञात चोरट्याने २२ सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास फोडून अंदाजे आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c4845303-bf08-11e8-b649-3d8da443dd77′]

इंदापूर शहरातील जुन्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कांबळे गल्लीतील शिवलिला मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्स दुकानाचे कटावनीने शटर उचकटून आत प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून गल्ल्यातील वीस हजार रुपये रोख व दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे, संगणकाचे हार्ड डिस्क, सीपीओ, चित्र संग्रह ई-बुक, मोबाईल अन्य वस्तूसह औषधे, सौंदर्यप्रसाधने असा अंदाजे किंमत ६ लाख ९२ हजार ७६० रुपयांचा माल व रोख रक्कम असा एकूण ७ लाख १९ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असल्याचे सागर सुरेश पवार यांनी सांगितले.

सांगली | गर्भपात प्रकरणात विटा येथील डॉक्टरला अटक

तसेच याच परिसरात असलेले चेतन फोटो स्टुडिओ फोडून संगणक, हार्ड डिस्क, फोटो कॅमेरा, दहा हजार रुपये रोख व दोन मोबाईल असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे स्टुडिओचे मालक काकासाहेब मांढरे यांनी सांगितले.सदर प्रकरणाबाबतची लेखी फिर्याद काकासाहेब मांढरे व सागर पवार यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दीली आहे.

[amazon_link asins=’B01KITZRBE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6efe2ee5-bf0a-11e8-ab01-d9aa50a43cfa’]