सराईत चोरट्यांकडून घरफोडीतील ११ लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

 

घरफोडी गुन्ह्यातील आणि मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून घरफोडीचे २० गुन्हे उघडकीस आले असून ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई हडपसर येथे करण्यात आली.

निखील उर्फ मॉन्टी कंगणे (रा. तळेगाव ढमढेरे, पुणे), अमोल रघुनाथ गोपकर (वय-२८ रा. चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कांगणे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

[amazon_link asins=’B07418TNB1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6e4d6fd5-ac5b-11e8-9e61-0d442c933bda’]

खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस कर्मचारी अमोल पिलाने यांना घरफोडीतील दोन आरोपी हडपसर येथील गांधी चौकात सोन्याचे दागिने विकण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथकाने हडपसर येथील गांधी चौकात असलेल्या एका सराफाच्या दुकानाजवळ सापळा रचला. कंगणे आणि गोपकर हे चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले.

दोन्ही आरोपींना लष्कर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आली होती. पोलीस कस्टडीत असताना त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत आरोपींनी हडपसर, चंदननगर, येरवडा, विमानतळ, वानवडी, फरासखाना, सहकारनगर, सिंहगड रोड, वारजे माळवाडी तसेच निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ११ लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उप निरीक्षक राहुल घुगे, पोलीस कर्मचारी अविनाश मराठे, पांडुरंग वांजळे, रमेश गरुड, उदय काळभोर, एकनाथ खंदारे, महेश कदम, मनोज शिंदे, प्रदीप शिंदे, संतोष मते, सचिन कोकरे, धिरज भोर, मंगेश पवार, फिरोज बागवान, शिवानंद बोले, हनुमंत गायकवाड, नारायण बनकर, प्रकाश मगर यांच्या पथकाने केली.

जाहिरात