दौंड तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच, कुरकुंभमध्ये दोन लाखांची चोरी

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन

गेल्या काही महिन्यांपासून दौंड तालुक्यात  सुरू झालेले चोऱ्यांचे सत्र आता वाढतच चालले आहे.अनेक दिवसांपासून हे चोरटे पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी होत असल्याचे त्यांच्या वाढलेल्या चोऱ्यांवरून दिसत आहे. मागील दोन आठवड्यापुर्वीच दौंड तालुक्यातील केडगाव येथे सुमारे सहा दुकाने फोडण्यात आली होती.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cf13f32b-9098-11e8-abeb-2315c7eb17d7′]

आता त्याचीच पुनरावृत्ती होऊन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या कुरकुंभमधील बाजार पेठेत असणाऱ्या दोन दुकानांना  चोरट्यांनी लक्ष करत सुमारे दोन लाखांचा ऐवज लुटून नेला  आहे. हि घटना गुरुवारी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास घडली असून दोन्ही दुकानांचे शटर उचकटून या चोऱ्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये आनंद जनरल स्टोअर मधून सव्वालाखांचा ऐवज लुटण्याचा आला असून बाजूला असणाऱ्या फिरंगाई कलेक्शन या कापड दुकानातून सुमारे पंच्याहत्तर रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती दुकानाचे मालक रशीद पिंजारी यांनी दिली आहे. दौंड तालुक्यातील विविध बाजारपेठांमधून मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होत असून यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.