सांगताय काय ! होय, चोरट्यांनी अख्खी ATM मशीनच नेली चोरुन

काटोल : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना सर्वत्र नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात असताना काटोल शहरातील संचेती ले आऊटमधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम सेंटरमधील अख्खी एटीएम मशीनच चोरट्यांनी पळवून नेली. चोरट्यांनी कुठलाही पुरावा मागे राहून नये, यासाठी सीसीटीव्ही व सीडीआर रोख रक्कम असा १७ लाख ४९ हजार रुपयांचा माल लंपास केला.

शहरातील संचेती ले आऊट परिसरात वीज कर्मचारी पतसंस्था कार्यालयाची इमारत असून या इमारतीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम आहे. सणासुदीचे दिवस असल्याने एटीएममध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड टाकण्यात येते. या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास संपूर्ण मशीन उचकटून काढून नेले. तसेच सीसीटीव्ही, डीव्हीआरही काढून नेला.

या एटीएममध्ये ११ ऑक्टोंबरला २३ लाख रुपयांची रोकड भरण्यात आली होती. त्यापैकी १३ ऑक्टोंबरपर्यंत १५ लाख ९९ हजार ७०० रुपये व दीड लाख रुपयांची मशीन असा १७ लाख ४९ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी चोरुन नेला. काटोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी