मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले पैसे, सोने चोरट्यांनी केले लंपास

पाथरी : पोलीसनामा आॅनलाइ – तालुक्यातील पेठ बाभळगांव येथे जगन्नाथ गिराम यांच्या घरी चोरी झाली आहे.
सदरील घटणा ही गावातील गिराम गल्ली येथे घडल्याने महिला व लहान बालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जगनाथ गिराम हे नेहमी प्रमाणे जायकवाडी परिसरातील फलाटावर बांधण्यात आलेल्या गुरा ढोरा पाशी झोपायला गेले असता,
घरामध्ये कोणी पुरुष मंडळी नसल्याची संधी साधून चोरटय़ांनी चैनल गेटचे कुलुप तांबी दृश्य औजारानी मोडत वाड्यात प्रवेश केला.
चैनल गेटच्या 30 ते 35 फुट अंतरावर समोर असलेल्या खोलीच्या दारावर लावण्यात आलेल्या कोंढ्याला बाजूला करुन प्रवेश घरात प्रवेश केला. कपाटाच्या बाजूला असलेल्या ड्रेसिंग टेबल मधुन कपाटाच्या चाब्या मिळवून कपाटातील शंभर, पाचशे, दोन हजाराच्या स्वरूपातील नोटा असे दिड लाख रुपये व सोन्याचे दागिने ज्यात एक 5 ग्रॅम झुंबर जोड, पाच पाच ग्रॅमचे दोन गंठण असा एेवज मिरा विठ्ठल जाधव यांचा गेला. तर जगन्नाथ गिराम यांच्या सुन व नातवंडांचे 10 ग्रॅम सोन्याचे झुंबर जोड, 5 ग्रॅम सोन्याचे कानातील वेल लहान मुलांचे 1 ग्रॅमचे सोन्याच्या मनगट्या, 1 ग्रॅम सोन्याचे कानातील डुल, अर्धा अर्धा ग्रॅम सोन्याचे गळ्यातील दोन ओम , पाच भाराचे चांदीचे दोन कडे असा मुद्दे माल चोरट्यांनी लंपास केला. तसेच जगन्नाथ गिराम यांच्या मुलाचे महत्वपूर्ण कागदोपत्री असलेल्या सुटकेस सारोळा रोडवरील डिपीपाशी टाकून दिल्याचे अवस्थेत आढळले.

सदरील घटना शुक्रवार 23 नोव्हेंबर रात्री दिड ते दोन वाजताच्या दरम्यान घडली असल्याचे कळते. मिरा जाधव त्यांच्या आई व मुलगी यावेळी चैनल गेट च्या बाजूच्या खोलीत झोपल्या असता हि घटना घडली. अद्याप पाथरी पोलीसात गुन्हा दाखल झाला नाही. ही सर्व रक्कम व दागिने मिरा जाधव यांनी मुलीच्या लग्नासाठी जमा केले होते.

पोलिस सह आयुक्त शिवाजी बोडखे यांचा सत्कार