पोलीस उपायुक्तांच्या अंगठीवर चोरट्यांचा डल्ला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

नागपूर शहरात दरोरज कोठे ना कोठे चोरीच्या घटना घडत असतात. पोलीस चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी रात्रंदिवस एक करत आहे. मात्र, चोरट्यांनी चक्क पोलीस उपायुक्तांची अंगठी चोरुन नेल्याने पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B071CY6D29,B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f3a2f17b-bcd8-11e8-8364-179ee88cc215′]

नागपूरचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार हे धंतोली परिसरातील एका खासगी रुग्णालयात एम.आर.आय काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी हातातील अंगठी व इतर वस्तू काढून ठेवल्या. चोरट्यांनी उपायुक्तांच्या अंगठीसह इतर ऐवजही लंपास केल्याने रुग्णालय आणि पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांच्याच वस्तू सुरक्षीत नाहीत तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.

नागपूरचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार अमआरआय काढण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या हातातील अंगठी आणि ऐवज टेक्निशिअनने एका ड्रॉवरमध्ये ठेवला आणि तपासणीसाठी गेले. थोड्या वेळाने एमआरआय काढल्यानंतर जेव्हा त्यांचा ऐवज परत देण्यासाठी कर्मचाऱ्याने ड्रॉवर उघडल्यावर त्याची भंबेरीच उडाली. ड्रॉवरमधील उपायुक्तांची अंगठी गायब होती. त्यामुळे रुग्णालयात आणि धंतोली पोलिसांत एकच खळबळ उडाली.
[amazon_link asins=’B07BR2PH18,B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fa179f9e-bcd8-11e8-b7b3-f1a4bdc319ff’]

पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासून पाहिल्यावर कळाले की, रुग्णालयातीलच एका महिला कर्मचाऱ्याने पोलीस अधिकाऱ्याच्या ऐवजावर हात साफ केला होता. पोलिसांनी अंगठी चोरणाऱ्या महिलेवर कारवाई करत तिच्याकडून अंगठी आणि ऐवज ताब्यात घेतला. दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याची अंगठी चोरिला गेल्याने नागपूरात चर्चेचा विषय बनला होता.

नागपूर : कळमेश्वर-सावनेर मार्गावर ट्रक-रिक्षाचा भिषण अपघात, पाच ठार  

You might also like