पोलीस महासंचालक (माजी) दर्जाच्या अधिकाऱ्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपुरात दोन-तीन दिवसांआड घरांमध्ये चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. या प्रकरणामुळे मात्र, नागपूर पोलिसांना मान खाली घालायची वेळ आली आहे. आता खुद्द महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या राहत्या घरीच चोरीची घटना घडल्याने नागपूर पोलीस दलात खळबळ माजली आहे. नागपूर येथील धरमपेठ परिसरात प्रबीरकुमार चक्रवर्ती यांचे घर असुन त्यांच्या घरातून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल देखील चोरट्यांनी लंपास केला आहे.
नागपूरच्या धरमपेठ भागातील झेंडा चौक परिसरात प्रबीरकुमार चक्रवर्ती यांची चार मजली इमारतीत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर त्यांचे घरगुती देवघर असून.त्यांच्या घरी पुजारी पूजा कारण्यासाठी येतात नियमितपणे ते काल सकाळी पूजेला आले असता देवघरातून काही सोने आणि चांदीचे मौल्यवान दागिने चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी तात्काळ ही बाब चक्रवर्ती कुटुंबियांना कळवली.
हे दागिने  घरातच तर कुठे ठेवल्या गेले नसतील ना म्हणून त्यांनी घरातच शोध घेण्यास सुरवात केली. मात्र, त्या वस्तू कुठेच न आढळल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनीही चोरीचे प्रकरण दाखल करुन घेत चोराचा शोध सुरु केला असून.अद्याप मात्र, चोराचा पत्ता लागू शकलेला नाही.गेल्या चार महिन्यांपासून घरात काम करणारा कर्मचारी घटनेनंतर बेपत्ता झाल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय आहे.सध्या त्या नोकराचा शोध घेतला जात आहे.