महामार्गावर गाड्या लुटणाऱ्या चोरट्यांना अटक 

लोणी काळभोर : पाेलीसनामा ऑनलाईन

हडपसर-सासवड मार्गावरील दिवेघाटात शनिवारी (ता. २२) मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक चालकास मारहाण करुन लुटणाऱ्या पाच जणांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकास मारहाण करुन लुटल्याप्रकरणी तुळशीराम शहाजी उघडे (वय- 19 वर्षे, रा. गोकुळनगर, कात्रज, मुळपत्ता, कोरेगाव ता. कर्जत जि. नगर) व लाला दादा वाघमारे (वय- 18 वर्षे, रा. गोकुळनगर, कात्रज मुळ पत्ता- सुस्ते ता. पंढरपुर जि. सोलापुर) या दोघांना चोरलेल्या मुद्देमालासह अटक केली आहे. तर वरील दोघांच्या समवेत ताब्यात घेतलेले तीनही अल्पवयीन मुलेही नगर जिल्हातील आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cef15ef0-c00e-11e8-9e1e-639f1e41163a’]

याप्रकरणी मंगलसिंग नगीना माथुर (वय- 43 वर्षे, रा. उरुळी देवाची ता. हवेली, मुळगाव- बंगरीसुभेद बिहार) यांनी तक्रार दिली होती.

उरुळी देवाची हद्दीतील एका गोदामातुन सोफासेटच्या वस्तु घेऊन शनिवारी (ता. 22) मध्यरात्रीच्या सुमारास मंगलसिंग माथुर हे हडपसर-सासवड मार्गावरील दिवेघाटातुन सासवड मार्गे साताऱ्याला जाण्यासाठी निघाले होते. त्याच्या ताब्यातील ट्रक दिवेघाटात आला असता, दोन मोटार सायकलवरुन आलेल्या पाच जनांनी ट्रक अडवली. व मंगलसिंग यांना मारहान करण्यास सुरवात केली. तसेच त्यांच्या खिशातील मोबाईल फोन व रोख रक्कम असा साडेआठ हजार रुपये किमतीचा ऐवज पळवुन नेला. सकाळी ही बाब मंगलसिंग माथुर यांनी ट्रकमालकाला सांगितल्यावर वरील प्रकार उघडकीस आला. दरम्यान मंगलसिंग माथुर व ट्रक मालकाने लोणी काळभोर पोलिसात जाऊन रविवारी (ता. २३ ) रात्री दहाच्या वाजनेच्या सुमारास गुन्हा दाखल केला.

गुन्हे शाखेत दोन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या