तळेगाव एमआयडीसीत कोयत्याने वार करुन तरुणाला लुटले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – तळेगाव एमआयडीसी येथे दुचाकीस्वारास आडवून, त्याच्यावर कोयत्याने वार करून, चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने चोरून नेली.

याप्रकरणी बाळू सोपान बनसोडे (४६, रा. मुकुंदनगर, आंबी, ता. मावळ) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात राज्यातील २ जवान शहीद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळू बुधवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून (एम एच १४ / डी एस ७२३७) तळेगाव एमआयडीसी रोडवरून जात होते. आंबी सर्कल येथील अॅक्सेस अॅग्रो कंपनीजवळ आले असता तीन अनोळखी आरोपी दुचाकीवरून आले. आरोपींनी बाळू यांच्या दुचाकीला दुचाकी आडवी लावून थांबवले.

एका आरोपीने कोयत्याचा धाक दाखवला. त्यामुळे बाळू गाडी सोडून पळून जात होते. त्यावेळी आरोपींनी बाळू यांच्यावर कोयत्याने वार केले आणि ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरून नेली. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.