मांड्यांची चरबी कमी करायचीय? करा काकडीचा रस आणि ताकाचा उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – विशेषता मांड्या आणि नितंबावरील चरबीमुळे महिला खूपच त्रस्त असतात. ही चरबी कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात. परंतु, अनेकदा त्याचा काहीएक उपयोग होत नाही. जीम, डाएटचा उपयोग होत नसल्याने महिला त्रस्त होतात. परंतु, अशी काही नैसर्गिक पेय आहेत ज्यामुळे मांड्या आणि नितंबावर जमा झालेली चरबी तर कमी होते. या पेयांमधील न्यूट्रियंट्समुळे चरबीच्या ज्वलनाची प्रक्रिया जलद होते.

काकडीच्या रसात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्याने मांड्यांच्या आजूबाजूची चरबी लवकर कमी होते. तसेच मधाचे पाण्यात फायबर अधिक प्रमाणात असल्याने मांड्यांची चरबी कमी करण्यात परिणामकारक आहे. ताकामध्ये प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात. जे मांड्या आणि नितंबाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. तसेच सोया मिल्कमध्ये अल्कलाइड्स असतात. ज्यामुळे मांड्यांची चरबी जलद कमी होते. यामधील करक्युमिन नितंब आणि मांड्यांची चरबी कमी करण्यात मदत करते. टोमॅटो सूपमध्ये लायकोपिन असते. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स दूर होतात आणि मांड्यांची चरबी कमी होते.
पुदिन्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. याचा सरबत घेतल्यास मांड्या, नितंबाची चरबी कमी करण्यात मदत होते. भोपळ्याच्या रसात कॅलरी कमी असतात. ज्यामुळे मांड्यांची चरबी कमी होते. अद्रकाच्या चहात अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. जे मांड्यांची चरबी कमी करण्यात फायदेशीर आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/