..म्हणून तैमूर अली खान पार्टीला जातो परंतु करीना त्याला तेथे जेवण करू देत नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – करीना कपूर आपल्या आहाराची विशेष काळजी घेते. ती एक फिटनेस फ्रीक आहे. करीनाला तैमूरचीही विशेष काळजी आहे. करीना तैमूरला केवळ घरातील जेवणच खायला देते. एका मुलाखतीत बोलताना तिने याबाबत खुलासा केला आहे.

मुलाखतीत बोलताना करीना म्हणाली की, “मी हायपर पॅरानॉयड आहे. तैमूर वाढदिवसांच्या पार्टीला तर जातो परंतु त्याला तिथे काही खाण्याची परमिशन नाही आहे. कधी तरी त्याला चिप्स खाण्याची परमिशन आहे. तैमूर जेवणत जास्ती करून घरात बनवलेले हेल्दी फूड असते, जसे खिचडी, इडली, डोसा. मी तैमूरचा डाएट प्लॅनही बनवते जो प्रत्येक महिन्यात बदलतो.”

पुढे बोलताना करीना म्हणाली की, “प्रत्येक महिन्यात मी तैमूरच्या आवडीनुसार डाएटमध्ये बदल करते. महिन्यात जी फळे आणि भाज्या त्याला खायला हव्यात त्या सगळ्या मी त्याला देत असते. त्यालाही या सगळ्यात खूप मजा येते. आज दुपारच्या जेवणात पालक होती त्याने पूर्ण कटोरी खाल्ली. नॉर्मली त्याला हे आवडत नाही. सुरुवातीला मला त्याला जबरदस्ती खाऊ घालावं लागलं. त्यामुळे आता त्याला याची सवय झाली आहे.

वर्कफ्रंट बद्दल सांगायचं झालं तर, सध्या करीना तिचा आगामी सिनेमा गुड न्यूजच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अक्षय कुमार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात कियारा आडवाणी आणि दिलजीत दोसांझ हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात तैमूर आहे अशीही चर्चा सुरु आहे. याची अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही.