पुणे रेल्वे स्टेशनजवळ आढळली बॉम्बसदृश्य वस्तू, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे रेल्वे स्थानकाच्या ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे पार्किंगच्या मागील रस्त्यावर एक हँण्ड ग्रेनेड सदृष्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या चार तासांच्या प्रयत्नानंतर ही वस्तू निकामी करण्यात आली. याची माहिती लष्कराला देण्यात आली असून या वस्तुचे अंश पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

ताडीवाला रस्त्यावर रेल्वे प्रशासनाचे मुख्य कार्यालय आहे. याच्या शेजारीच रेल्वे स्थानकाच्या फलाटावर जाण्याकरिता पादचारी उड्डाणपुल आहे. या पुलाच्या शेजारी असलेल्या पार्किंगच्या मागील रस्त्यावर साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला हँड ग्रेनेड सदृश्य वस्तु आढळून आली. कर्मचाऱ्याने याची माहिती तात्काळ रेल्वे सुरक्षा बलाचे संतोष बडे आणि कॉन्स्टेबल विकास पाटील यांना दिली.

रेल्वे सुरक्षा बलाने घटनास्थळी धाव घेत श्वान पथक व पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. बंडगार्डन पोलीस व बीडीडीएस पथकाने घटनास्थळी येऊन परिसराची नाकेबंदी करून पहाणी केली असता हँड ग्रेनेड सदृश्य वस्तू आढळू आली. बीडीडीएसच्या पथकाने ती वस्तु रेल्वेच्या मोकळ्या मैदानात नेऊन तिचा स्फोट घडवून नष्ट केली. या वस्तुचे नमुने गोळा करून पुढील तपासणीकरीता फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

Visit : policenama.com