नेमकी कोण आहे राज ठाकरेंची सुन ? जाणून घ्या…

मुंबई : वृत्तसंस्था – राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काहीना काही कारणांसाठी सतत चर्चेत असतातच. आता मात्र त्यांचा मुलगा अमित ठाकरे चर्चेत आहेत. अमित ठाकरेंचं लग्न हा सध्या चर्चेचा विषय आहे. त्यामुळे राज ठाकरेंची सुन नेमकी कोण असणार आहे ? काय करते ? असे अनेक प्रश्न लोकांना पडत आहेत.

मिताली बोरुडे असं या मुलीचं नाव आहे. दिनांक २७ जानेवारीला त्यांचा हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या दोघांचा साखरपुडा ११ डिसेंबर २०१७ ला झाला होता. लग्नाची तारिख जवळ आल्याने राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच लग्नाची आमंत्रणे देण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरेंनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत रतन टाटा यांची भेट घेत त्यांना अमितच्या लग्नाचं पहिलं आमंत्रण दिलं आहे.

हा विवाहसोहळा अगदी आटोपशीर पद्धतीनं करणार असल्याचेही यापुर्वी राज यांनी सांगितलं होतं.

मिताली बोरूडेबद्दल माहिती
१. मिताली ही मूळची मुंबईचीच मुलगी आहे. ती फॅशन डिझायनर आहे.

२. मितालीने आपली १२ वी रुईया महाविद्यालयातून दिली असून पुढील पदवीपर्यंतचे शिक्षण रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले आहे.
३. बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय बोरूडे यांची ती मुलगी आहे.
४. राज ठाकरेंची कन्या उर्वशी ठाकरेची मिताली घट्ट मैत्रिण आहे. या दोघींनी मिळून काही वर्षांपूर्वी ‘द रॅक’ हा फॅशन ब्रँड तयार केला होता.
५. मध्यंतरी ठाकरे कुटुंब युरोप टूरला गेले होते. त्यावेळी मिताली त्यांच्यासोबत गेल्याचेही काही दिवसांपूर्वी समोर आले आहे.
६. अमित आणि मिताली मागील ५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
You might also like