तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये तांब्याच्या वस्तू वापरतो. तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असत. असं म्हंटल जात. पण हे पाणी आपण फक्त भांड्यात भरून ठेऊ शकतो. बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे बाजारात आता तांब्याची बॉटल आली आहे. तांब हे खूप महाग असत. त्यामुळे हि बॉटलही खूप महाग आहे. त्यामुळे हि बॉटल खरेदी करताना आवश्यक ती काळजी घ्यायला हवी.

तांब्याची बॉटल खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी ते खालील प्रमाणे:

१) पहिली गोष्ट म्हणजे आपण जी बॉटल खरेदी करतोय. ती खरच तांब्याची आहे का हे पाहणे गरजेचे आहे. ती बॉटल तांब्याची आहे का नाही. हे पाहण्यासाठी त्या बॉटलवर लिंबू चोळा लिंबू चोळल्यावर जर बॉटलचा कलर गेला. तर ती बॉटल तांब्याची नाही. असे समजा.

२) तांब्याची बॉटल खरेदी करताना आधी त्यावरील माहिती वाचा. बॉटल बनवताना त्यात जर अजून कोणता धातू वापरला आहे. असं लिहाल असेल तर ती बॉटल घेऊ नका.

३) तांब्याची बॉटल खरेदी करताना बॉटल च तोंड मोठं पाहून घ्या. कारण तांब कालांतराने काळ पडत. मग बॉटल आत मधून धुता यायला हवी यासाठी बॉटलच तोंड मोठं असंण आवश्यक आहे.

अशाप्रकारे तांब्याच्या बॉटल मधील पाणी पिल्याने तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहते, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते, त्वचेचं तारूण्य टिकतं तसेच इन्फेक्शनपासूनही बचाव होतो. पण हि बॉटल खरेदी करताना वरील आवश्यक ती काळजी घ्या जेणेकरून बॉटल खरेदी करताना तुमची फसवणूक होणार नाही.

फेसबुक पेज लाईक करा –