1 सप्टेंबरपासून होणारे ‘हे’ 5 बदल, होणार थेट तुमच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सप्टेंबरच्या सुरूवातीस देशाच्या आर्थिक व्यवस्थेत अनेक महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत. सप्टेंबरमध्ये, बरेच आर्थिक नियम लागू होणार आहेत जे आपल्या खिश्यावर थेट परिणाम करू शकतात. जर आपल्याला या बदलांमुळे काही ठिकाणी दिलासा मिळेल तर काही बदल मात्र तुमचा खर्च वाढवतील.  उदाहरणार्थ  रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडले असता अधिकचा दंड भरावा लागेल तर दुसरीकडे, भारतीय स्टेट बँकेचे (एसबीआय)  गृह कर्ज स्वस्त होईल, याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. जाणून घेऊयात अशाच काही महत्त्वपूर्ण बदलांविषयी. अशाच काही बदलांविषयी जाणून घेऊयात.

१.  वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल भारी दंड :

१ सप्टेंबरपासून बरेच रहदारी नियम बदलतील, त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडण्यासाठी तुम्हाला आता जास्त दंड भरावा लागेल. १ सप्टेंबरपासून मोटार वाहन (दुरुस्ती) कायद्यातील ६३ नवीन तरतुदी अंमलात येतील. ज्यानंतर आता दारू पिऊन वाहन चालविणे, ओव्हरस्पीड करणे, ओव्हरलोडिंग यासाठी दंड वाढविण्यात आला आहे. त्याचबरोबर रस्ता बांधकामात अडथळा निर्माण झाल्याने झालेल्या अपघातामुळे एखाद्या कंपनीला किंवा कंत्राटदाराला एक लाख रुपये दंड आकारला जाईल.

२.करविषयक बाबींचा निपटारा त्वरित होईल :

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जुन्या कराच्या बाबींबद्दल सामोरे जाण्यासाठी एक नवीन योजना आणली आहे. या योजनेंतर्गत आता करविषयक बाबींवर तोडगा लवकर होईल. ही योजना १ सप्टेंबरपासून सुरू होणार असून ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या योजनेत थकित कर भरता येईल मात्र कर भरण्याबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही. कर भरल्यानंतर व्याज, दंडातूनही सूट मिळेल. याअंतर्गत ५० लाखांपर्यंतच्या करावर ७० टक्के, ५० लाखाहून अधिक करांवर ५० टक्के, अपील परताव्यावर ६० टक्के आणि ५० लाखाहून अधिक कर असल्यास  अपील मागे घेतल्यास ४० टक्के सूट देण्यात येईल. याव्यतिरिक्त, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडे अपील दाखल करण्यासाठीचा सीमा अनुक्रमे १ कोटी आणि २ कोटी रुपयांची ठेवली गेली आहे.

३. वाहनांचा ऑन डॅमेज विमा उपलब्ध :

जनरल विमा कंपन्या आता वाहनांना भूकंप, पूर, नैसर्गिक आपत्ती आणि दंगा या घटनांमुळे झालेल्या नुकसानीसाठी स्वतंत्र विमा संरक्षण देतील.

४. एसबीआयच्या सर्व विद्यमान आणि नवीन ग्राहकांना आरएलएलआरवर गृह कर्ज :

एसबीआयकडून कर्ज घेऊन घर खरेदी करणे आता स्वस्त झाले आहे. एसबीआयने गृहकर्ज व्याज दरात ०.२० टक्क्यांनी कपात केली आहे. १ सप्टेंबरपासून गृह कर्जावरील व्याज दर ८.२५ टक्के राहील. ऑगस्टमध्येच आरबीआयने रेपो दर ५.४० टक्क्यांवर आणला आहे.

५. तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकवर विशिष्ट आरोग्य चेतावणी :

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने तंबाखूजन्य पदार्थांच्या इशार्‍यासाठी नवी अधिसूचना जारी केली आहे. त्यासाठी सिगारेट व इतर तंबाखू उत्पादन (पॅकेजिंग व लेबलिंग) नियम २००८ मध्ये बदल करण्यात आले आहेत. नवीन नियम १ सप्टेंबर २०१९ पासून लागू होतील.

आरोग्यविषयक वृत्त –