पुढील आठवड्यापर्यंत करा ‘ही’ 5 महत्वाची कामे, अन्यथा अडकू शकतात तुमचे पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हा महिना काही दिवसांतच संपतोय यामुळे जरुरी आहे की 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही सर्व महत्वाची कामे करून घ्या. कारण हा महिना संपल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये बदल करण्यात येणार आहेत. पंतप्रधान शेतकरी योजने अंतर्गत आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख देखील जवळ आलेली आहे. जाणून घ्या 30 नोव्हेंबरच्या आधी कोणती कामे पार पडणे महत्वाचे आहे.

लाइफ सर्टिफिकेट जमा करणे महत्वाचे
एसबीआय बँकेने आपल्या खाते धारकांना 30 नोव्हेंबर पर्यंत लाइफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी सांगितले होते. जर तुम्ही निवृत्त असाल आणि तुमची पेन्शन एसबीआय खात्यामध्ये येणार असेल तर हे सर्टिफिकेट जमा करणे खूप महत्वाचे आहे. देशातील सर्वात जास्त पेन्शन धारक खाते एसबीआयकडे आहेत त्यामुळे एसबीआयने आपल्या खातेधारकांना खूप आधीच याबाबत सूचना दिल्या होत्या.

(2) 15 % नी विमा पॉलिसीची दर वाढू शकतात
विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने नॉन लिंक्ड आणि लिंक्ड विमा पॉलिसी संधर्भात जुलै महिन्यात नवीन नियम सुरु केले होते. हे नियम 1 डिसेंबर 2019 पासून लागू होणार आहेत. इरडाने सर्व विमा कंपन्यांना नवीन नियम सुरु करण्यासही कालावधी ठरवून दिला आहे. त्यामुळे 1 डिसेंबर पासून नव्या नियमानुसार पॉलिसीची विक्री केली जाणार आहे.

(3) PMAY साठी आधार कार्ड देणे गरजेचे
30 नोव्हेंबर 2019 पर्यंत पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा फायदा मिळवण्यासाठी आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. जर आधार लिंक केलेले नसेल तर यामुळे मिळणार सहा हजार रुपयांचा निधी तुमच्यापर्यंत पोहचणार नाही. तसेच जम्मू काश्मीर, लद्दाख, आसाम आणि मेघालयाच्या शेतकऱ्यांसाठी 31 मार्च 2020 ही आधार कार्ड देण्याची अंतिम तारीख असणार आहे.

4) LIC पॉलिसी रिवाइझ करण्याची अंतिम तारीख
एलआयसी 30 नोव्हेंबर पासून आपल्या अनेक पॉलिसी बंद करत आहे. अशात जुन्या धारकांना निश्चित केलेला फायदा मिळणार आहे परंतु तरही पॉलिसी धारक आपल्या पॉलिसीबाबत विचार करू शकतात आणि अंतिम तारखेपर्यंत निर्णय घेऊ शकतात. मात्र 30 नोव्हेंबर नंतर अनेक मोठं मोठ्या पॉलिसीमध्ये बदल होणार आहेत.

5) इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख
जम्मू काश्मीर आणि लदाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयकर भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2019 आहे. काश्मीर आणि लदाख मध्ये इंटरनेट सेवा विस्कळीत असल्याने ही आयकर भरण्याची तारीख वाढवून 30 नोव्हेंबर करण्यात आलेली आहे. 2 लाख 50 हजारांपेक्षा अधिक इनकम असलेल्या व्यक्तीने टॅक्स भरणे गरजेचे आहे.

Visit :  Policenama.com