होळी खेळताना मोबाईल पाण्यात पडल्यास ‘तात्काळ’ करा ‘हे’ काम, अजिबात ‘नुकसान’ नाही होणार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : आज होळी रंगांचा सण, लोक एकमेकांना रंग लावतात आणि पाणी फेकतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही पाण्याने होळी खेळत असाल तर तुमच्या काही वस्तूंची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. त्यात महत्वाचे म्हणजे मोबाईल फोन. होळी खेळत असताना आपला  मोबाईल  सुरक्षित ठिकाणी ठेवा जेणेकरून पाण्यापासून त्याचा बचाव होईल.  परंतु जर आपला फोन चुकून पाण्याने भिजला असेल तर..  आपल्याला काळजी करण्याची गरज नाही.

जर फोन पाण्यात पडला तर त्याला हलविण्यापेक्षा त्याला कोरड्या जागी ठेवा आणि त्वरित कोरड्या कपड्याने पुसण्याचा प्रयत्न करा. पाण्यात फोन पडल्यावर त्याला चेक करण्यासाठी कोणतेही बटण किंवा टच दाबू नका. असे केल्याने डिव्हाइस बोर्ड क्रॅश होण्याची शक्यता आहे.

फोनची बॅटरी त्वरित काढा : 

फोन ओला झाल्यावर त्वरित मोबाईल फोनचे कव्हर आणि बॅटरी काढून टाका, कारण फोन चालू केल्यास डिव्हाइसमध्ये शॉट सर्किट होण्याचा धोका वाढतो, म्हणून बॅटरी त्वरित काढा. बॅटरी काढल्यानंतर, मऊ कापड किंवा कागदावर किंवा टॉवेल्सवर ठेवा. बॅटरीसह मोबाईल फोनमधून सिम कार्ड आणि एसडी कार्ड बाहेर काढा आणि त्याचा ट्रे देखील बाहेर काढा, दरम्यान, लक्षात ठेवा कि, त्याला जास्त हलवू नये.

कोणत्याही कोरड्या कपड्याने किंवा टॉवेल्सने मोबाइल फोन त्वरित पुसून टाका. जर फोनमध्ये जास्त पाणी असेल तर ते लगेच व्हॅक्यूम किंवा ड्रायरने वाळवा. यानंतर, आता मोबाइल फोनमधील ओलावा काढावा लागेल. यासाठी तुम्हाला फोन तांदळाच्या पॅकेट किंवा बॉक्समध्ये ठेवावा लागेल. तांदळामध्ये हायग्रोस्कोपिक गुणधर्म आहेत ज्यामुळे ओलावा सहजपणे काढू शकतो. याशिवाय आपण सिलिका पॅकेट देखील वापरू शकता.

फोनचा ओलावा शोषून घेईल अश्या ठिकाणी फोनला ठेवा. यासाठी आपण आपला फोन खुल्या हवेत  किंवा फॅनच्या हवेत ठेवू शकता. मोबाइल फोन पूर्णपणे कोरडा झाला असे वाटत असल्यास तेव्हाच फोन चालू करा. अन्यथा, थोडी शंका असल्यास, मोबाईल फोन टेक्निशियनकडे जाऊन मोबाईल ठीक करून घ्या, स्वतः फोन चालू करण्याच्या भानगडीत पडू नका.