होळीला करा ‘या’ 7 पैकी कोणताही एक उपाय, कधीच पैशांची कमतरता भासणार नाही, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाला आपले वेगळे महत्व असते. त्यातील एक म्हणजे होळीचा सण, याला ‘रंगांचा उत्सव’ असेही म्हणतात. होळीचा सण दोन दिवस साजरा केला जातो. यंदा २८ मार्च रोजी होलिका दहन आणि २९ मार्च रोजी सकाळी रंगपंचमी खेळण्यात येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी काही विशेष काम केल्याने सर्व शक्ती घरातून निघून जातात आणि पैसाची वाढ होते. या दिवशी घरात काही खास वस्तू आणल्यामुळे सुख, संपत्ती मिळते.

हत्था जोडी

हत्था जोडी दिसायला धोतऱ्याच्या झाडासारखी असते. तंत्र विद्यामध्ये याला अतिशय महत्व आहे. शनिवारी हे खरेदी करून लाल कपड्यात बांधून लॉकर जवळ ठेवा. असे म्हंटले जाते की हे केल्याने पैशात वाढ होते. जर तुम्हाला शनिवारी हे करणे शकय नसेल तर तुम्ही मंगळवारी करू शकता.

श्रीयंत्र

श्रीयंत्रात लक्ष्मीसमवेत ३३ कोटी दिव्य शक्ती आहेत. हे दुकानात अथवा घरात संपत्तीच्या ठिकाणी ठेवल्यास आपल्या संपत्तीत वाढ होईल.

मोती शंख

मोती शंख आपल्याला आर्थिकदृष्ट्या बळकट बनवीत नाही तर बऱ्याच प्रकारचे शाररिक आजार बरे करण्यास मदत करते. ते स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवल्यास संपत्ती वाढते.

पिवळ्या रंगाची कढई

ही शुक्रवारी खरेदी करा आणि लाला कपड्यात बांधून घ्या आणि लॉकरजवळ ठेवा. जोतिषशास्त्रानुसार असे केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते.

गोमती चक्र

जर तुम्ही पैसे कमावून वाचवू शकत नसाल तर ११ गोमती चक्र पिवळ्या कपड्यामध्ये बांधून लॉकरमध्ये ठेवा. त्यामुळे संपत्तीत वाढ होईल.

पांढऱ्या रुईची मुळे

जोतिषशात्रानुसार असे म्हंटले जाते की शुभ वेळी पांढऱ्या रुईची मुळे पैसे असलेल्या ठिकाणी ठेवल्यास संपत्तीत वाढ होते.

एकाक्षी नारळ

एका डोळ्याच्या नारळाला ‘एकाक्षी नारळ’ असे म्हणतात. ज्या घरात या नारळाची पूजा केली जाते तेथे देवी लक्ष्मीची कृपा राहते. यामुळे घरात सुख आणि संपत्ती कायम राहते.