पूजा करताना गणपतीसमोर ‘या’ 5 गोष्टी आवर्जून ठेवा, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – घराघरात गणपती बाप्पांची स्थापना होण्यासाठी आता अवघे १५ दिवस उरले आहेत. प्रत्येकजण गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करत आहे. अनेकांनी घराच्या सफाईलाही सुरुवात केली आहे. बाप्पाच्या आगमनासाठी जो तो आतुर आहे. तुम्हालाही जर बाप्पाला खुश करायचे असेल तर तुम्हीही त्यांच्या आवडीच्या या गोष्टी आणल्या पाहिजेत.

१) मोदक – मोदक बाप्पांना विशेष आवडतात हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे बाप्पाला खुश करण्यासाठी पूजेच्या वेळी बाप्पासमोर मोदक नक्की ठेवा.
momos
२) दुर्वा – आपण गणेशाची स्थापना केल्यानंतर रोज बाप्पाला दुर्वा वाहतात. त्यामुळे तुम्हीही रोज बाप्पाला दुर्वा वाहायचे लक्षात असू द्या.
durva
३) जास्वंदीचं फूल – जास्वंदीचं फूल गणपती बाप्पाला खूप आवडतं. त्यामुळे बाप्पाला जास्वंदीचं फूल वाहायला विसरू नको.
flower
४) केळी – गणपती बाप्पासमोर कोणती फळे ठेवायची हा प्रश्न जर तम्हाला पडला असेल तर लक्षात घ्या त्यांना केळी खूप आवडतात. परंतु नैवेद्य म्हणून एकेक केळ ठेवू नका तर केळीचा घड बाप्पाला ठेवणं कधीही उत्तम आहे.

५) शंख – तुम्ही गणपती बाप्पाची मुर्ती पाहिली की, लक्षात येईल की, बाप्पांच्या ४ हातांपैकीही एका हातात शंख आहे. त्यामुळे बाप्पाच्या पुजेवेळी तुम्ही शंख नक्की ठेवा. तुम्ही पाहिले असेल बाप्पाच्या पुजेवेळी आणि आरतीवेळीही शंख वाजवला जातो. बाप्पालाही शंख आवडतो.

आरोग्यविषयक वृत्त –