‘बॅलन्स ट्रान्सफर’चा लाभ घेतला तर सणासुदीत क्रेडिट कार्डच्या बिलामुळे होणार नाही ‘अडचण’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना विविध ऑफर बँका आणि कंपन्या देत असतात. अनेकजण सणासुदीला मोठ्या वस्तूंची खरेदी तसेच मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. नवीन घर, गाडी, सोन्याचे दागिने किंवा मोठ्या वस्तूंची खरेदी करत असतात. मात्र अनेक वेळा पैश्यांची कमी असल्यामुळे खरेदी करू शकत नाही. यामुळे काही जण क्रेडिट कार्ड खरेदी करत असतात. मात्र यासगळ्यात याच्याशी निगडित एक महत्वाची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात, मात्र त्यानंतर त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

संपूर्ण माहिती जाणून घ्या
सुरुवातीला क्रेडिट कार्ड घेताना त्याच्याशी निगडित संपूर्ण माहिती जाणून घेणे फार महत्वाचे असते. कॅशबॅक, रिवार्ड पॉईंट्स, तसेच हफ्ते कशाप्रकारे भरावेत याची माहिती तुमच्याकडे असणे महत्वाची असते.

बॅलेन्स ट्रान्स्फर केल्याने व्याज वाचणार
भारतात विविध कंपन्या क्रेडिट कार्डवर कॅशबॅक देत असतात. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणत खरेदी करत असतात. यामुळे बॅलेन्स ट्रान्स्फर करणे सर्वात फायद्याचे होऊ शकते. मात्र वेळेवर पैसे भरणे ग्राहकांना बंधनकारक असते. यामुळे तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागत नाही. मात्र यासाठी ग्राहकांना प्रोसेसिंग फी द्यावी लागते.

या गोष्टी ठेवा लक्षात
सहा महिन्यांपर्यंत ग्राहक कर्ज देण्यासाठी पैसे जमा करू शकतात. मात्र काही क्रेडिट कार्डमध्ये हि सुविधा नसून याची तुम्ही आधी माहिती जाणून घ्यावी. त्यामुळे तुम्हाला तोटा सहन करावा लागणार नाही.

 

Visit  :Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like