देवघराशी संबंधीत ‘या’ 5 चूका अतिशय ‘अशुभ’, घरात होऊ शकते ‘धन’ आणि ‘सुखा’ची कमतरता

पोलीसनामा ऑनलाइन – प्रत्येक घरात शुभ ऊर्जेच्या संचारासाठी मंदिर असणे आवश्यक आहे. घरात मंदिर किंवा देवघराचे स्थान योग्य असल्यास अनेक प्रकारच्या समस्या आपोआप दूर होतात. विशेष म्हणजे आरोग्य आणि मनाच्या समस्यांचे निवारण लवकर होते. घरात मंदिर असल्याने आर्थिक समृद्धी कायम राहाते. घरात देवघर असल्याने घरातील लोकांमध्ये आपसात ताळमेळ कायम राहातो.

नियमानुसार तयार करा देवघर
मंदिर किंवा देवघराचा पूर्ण लाभ तेव्हाच मिळू शकतो जेव्हा याची स्थापना करताना नियमांचे पालन केले जाते. यासाठी जरूरी आहे की, योग्यप्रकारे मंदिराची स्थापना करा, देवी-देवतांची स्थापना करताना नियमांचे पालन करा. देवघराला जागृत ठेवले जावे.

देवघरात या गोष्टींकडे ठेवा लक्ष
देवघर हे इशान्य कोपर्‍यात असावे. जर इशान्य कोपर्‍यात करता येत नसेल तर किमान पूर्व दिशेचा वापर करा. जर फ्लॅटमध्ये राहात असाल तर सूर्य प्रकाशाकडे लक्ष ठेवा. देवघर एकाच ठिकाणी असावे आणि त्याची जागा सारखी बदलू नये. देवघराचा रंग हलका पिवळा किंवा पांढरा ठेवा, गडद रंग टाळा. त्रिकोणी किंवा घुमटाचे मंदिर देवघरात ठेवण्याऐवजी केवळ पूजेची छोटी जागा तयार करा.

देवी-देवतांची स्थापना कशी करावी
मंदिराची प्रतिकृती ठेवण्याऐजवी देवघर बनवा. यामध्ये देवी-देवतांची गर्दी करू नका. ज्या देवीची किंवा देवाची तुम्ही प्रामुख्याने उपासना करता त्यांचे चित्र अथवा मूर्तीची स्थापना एका आसनावर किंवा चौरंगावर करा. इतर देव बाजूला स्थापन करा.

भांड्यात पाणी भरून ठेवा
जर मूर्तीची स्थापना करायची असेल तर ती 12 बोटांपेक्षा मोठी नसावी. चित्र कितीही मोठी असू शकतात. पूजेच्या ठिकाणी शंख, गोमती चक्र आणि एका पात्रात पाणी भरून ठेवा.

असे करा पूजास्थळ जागृत
दोन वेळा पूजा उपासनेचा नियम करा. सायंकाळच्या पूजेत दीप जरूर लावा. दीप पूजास्थळाच्या मध्यभागी ठेवा. पूजेच्या अगोदर थोडे किर्तन किंवा मंत्रजप केल्याने संपूर्ण घरात सकारात्मक उर्जा भरली जाते.

मंदिर स्वच्छ ठेवा
मंदिर नेहमी स्वच्छ ठेवा आणि तेथे एका भांड्यात नेहमी पाणी भरून ठेवा. तुम्ही कोणतीही पूजा करत असाल, पण गुरूमंत्र मिळाला नसेल तर गायत्री मंत्राचा जप करा. पूजेनंतर अर्पण केलेले जल प्रसाद म्हणून ग्रहण करा.

पूर्वजांची चित्र ठेवू नका
पूजेच्या ठिकाणी अस्वच्छता असून नये. पूर्वजांची चित्रं लावू नयेत. शनी देवाचे चित्र किंवा मूर्ती ठेवू नका. शक्य असेल तर पूजास्थळावर अगरबत्ती लावू नका. पूजास्थळाचा दरवाजा बंद ठेवू नका. पूजास्थान स्वयंपाक घर किंवा स्टोअर रूममध्ये बनवू नका.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like