Vastu Tips : धनहानीपासून वाचायचे असेल तर चुकूनही ठेवू नका ‘या’ 9 वस्तू

पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या जीवनात वास्तुशास्त्राला विशेष महत्व आहे. घरातील प्रत्येक वस्तु वास्तुशास्त्रानुसार ठेवल्यास जीवनात आनंद आणि सूख येते. जर वास्तुनुसार वस्तू आणि दिशेची निवड केली गेली नाही तर जीवनात नकारात्मकता येते, ज्यामुळे धनहानी वाढू शकते. अनेकदा नकळत आपण घरात अशा वस्तू ठेवतो किंवा असे काम करतो ज्यामुळे धनहानी होऊ लागते.

अशावेळी आपल्याला यापाठीमागील कारणे समजत नाहीत आणि आपला पैसा निरर्थक कामात नष्ट होऊ लागतो. जर अनावश्यक खर्च होऊ लागले आणि पैसा व्यर्थ कामात नष्ट होऊ लागल्यास कोणत्या वस्तू घरात ठेवू नये ते जाणून घेवूयात…

1 धबधबा, पाण्याचे छायाचित्र
कधीही घरात असे छायाचित्र लावू नका ज्यामध्ये धबधबा वाहत आहे किंवा कोणत्याही माध्यमातून पाणी पडत असेल तर असे छायाचित्र घरात लावू नका यामुळे धनहानी होते. पैसा व्यर्थ कामात पाण्यासारखा वाहून जातो.

2 पाणी गळणारा नळ
घरात कुठेही असा नळ असू नये ज्यामधून पाणी थेंब-थेंब पडत असेल, पाण्याप्रमाणे पैसासुद्धा नष्ट होतो असे म्हटले जाते. अशा नळाचा आवाज सुद्धा नकारात्मक उर्जा निर्माण करतो. असे नळ बदलून टाका.

3 कॅक्टस किंवा कोटेरी रोपं
वास्तुनुसार घरात कोणत्याही प्रकारची काटेरी रोपं लावू नये. विशेषकरून कॅक्टस लावू नये. यामुळे नात्यात दरी निर्माण होते. भांडणे होतात, पैसा खर्च होतो. अशी रोपे असतील तर ती ताबडतोब हटवा.

4 बाथरूम कधीही ओले ठेवू नका
ओले बाथरूम नेहमी धनहानीचे संकेत देते. बाथरूम वापरले असेल तर ताबडतोब ते सुकू द्या.

5 गॅस किंवा चुलीवर नेहमी भांडे ठेवू नका
जेवण बनवल्यानंतर गॅस किंवा चुलीवर आणि किचनवर भांडी एकत्र करून ठेवू नका. भांड्यांचा गराडा भांडणाला निमंत्रण देतो, पैसा विनाकारण खर्च होतो.

6 स्वयंपाक घरात औषधं ठेवू नका
कधीही स्वयंपाक घरात औषधे ठेवू नका, वास्तूशास्त्रानुसार हे चुकीचे आहे. यामुळे आजारपणासाठी जास्त पैसा खर्च होतो. आजार होतात.

7 काचेच्या तुटलेल्या वस्तू
काचेची कोणतीही तुटलेली वस्तू घरात न ठेवता फेकून द्या. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, धनहानी होती. तसेच खिडकी, दरवाजाच्या तुटलेल्या काचा बदलून घ्या.

8 नादुरूस्त विद्यूत उपकरणे
कोणतेही बिघडलेले विद्यूत उपकरण, जसेकी टीव्ही, फ्रिज, बंद घड्याळ अशा वस्तू घरात ठेवू नका. यामुळे धनहानी होते, नकारात्मक उर्जा आणि रोग घरात प्रवेश करतात.

9 उत्तर दिशेला डस्टबिन ठेवू नका
उत्तर दिशा कुबेराची दिशा म्हणतात. यासाठी चुकूनही या दिशेला डस्टबिन ठेवू नका. यामुळे धनहानी होते.