मारुती कार लोनवर घेण्याचा विचार करताय ? कंपनीने सुरू केली ‘ही’ विशेष सेवा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : दिग्गज वाहन निर्माता मारुती सुझुकीने कार खरेदीसाठी ऑनलाइन फायनान्स सुविधा सुरु केली आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहक घरातूनच कारचे फायनान्स करू शकतील. ही सुविधा मारुतीच्या एरेना प्लॅटफॉर्मच्या ग्राहकांसाठी आहे. स्मार्ट फायनान्स सर्व्हिस अंतर्गत तुम्हाला मारुती कारसाठी घरबसल्या लोन मिळेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार डिजीटल पद्धतीने कार खरेदी करण्याचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला होईल. या सेवेच्या सुरूवातीस कार खरेदीमध्ये 26 पैकी 24 स्टेप्सचे डिजिटायझेशन केले गेले आहे. याद्वारे ग्राहक रिअल टाइममध्ये कर्जाची स्थिती जाणून घेण्यास सक्षम असतील. आता कंपनीच्या वेबसाइटवर वेगवेगळ्या फायनान्सरशी संबंधित वेबसाइट्स आणि लेंडर्सच्या ऑफरची माहिती उपलब्ध होईल. यापूर्वी, ग्राहकांना फायनान्स वेबसाइट्स आणि लेंडर्सची माहिती स्वतंत्रपणे शोधावी लागायची.

अर्ज करण्याची प्रक्रिया :
अर्ज करण्यासाठी ग्राहकांनी प्रथम मारुती सुझुकीच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. कारची निवड करावी लागेल, त्यानंतर, फायनान्सर्सना त्यांच्या इच्छेनुसार निवड करावी लागेल. असे केल्यावर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतात. फायनान्सर सर्व कागदपत्रे आणि तपशील सत्यापित करून कार कर्जाची ऑनलाइन तपासणी करतील.

या फायनान्सरसोबत करार: –
– स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय बँक)
– एचडीएफसी बँक (एचडीएफसी बँक),
– महिंद्रा फायनान्स,
– आयसीआयसीआय बँक (आयसीआयसीआय बँक)
– इंडसइंड बँक
– बँक ऑफ बडोदा –
– चोलामंडल फायनान्स ,
– कोटक महिंद्रा प्राइम
– अ‍ॅक्सिस बँक
– एयू स्मॉल फायनान्स बँक
– येस बँक
-एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस.