मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची ‘कोरोना’ चाचणी 11 व्या दिवशी देखील पॉझिटिव्ह

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना २५ जुलै रोजी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होत. त्यानंतर त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, रविवारी त्यांची तिसरी कोरोना चाचणी सुद्धा पॉझिटिव्ह आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी दिली. मुख्यमंत्री चौहान यांच्यात कोणत्याही प्रकारची लक्षण दिसत नसून, पुढील अहवाल येईपर्यंत ते रुग्णालयातच राहतील, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर गेल्या ११ दिवसांपासून चिरायू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी साधना सिंह आणि त्यांची मुले, कार्तिकेय आणि कुणाला यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. चौहान यांनी रविवारी ट्विट करत “रविवारी सकाळी ( नवव्या दिवशी) चाचणीसाठी नमुने घेतल्यात आले असून, अहवाल निगेटिव्ह आला तर सोमवारी रुग्णालयातून सुट्टी मिळेल’ अशी आशा व्यक्त केलेली. पण अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयात मुक्काम वाढला.

मुख्यमंत्री रुग्णालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सातत्याने बैठक घेत असून, राज्यातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत. तसेच रुग्णालयात आपली स्वतःची कामे स्वतःच करत आहेत. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘कोरोना रुग्ण आपले कपडे धुण्यासाठी दुसऱ्या कोणाला सुद्धा देऊ शकत नाही, मला कपडे धुण्याचा फायदा झाला. माझ्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कित्येक फिजिओथेरपी सत्रानंतर देखील मी माझ्या मुठी आवळू शकत नव्हतो. पण आता कपडे धुतल्यामुळे मी माझ्या मुठी आवळू शकतो’ असे त्यांनी म्हटलं

दरम्यान, मध्य प्रदेशात सध्या ९२८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २४ हजार ०९९ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केलीय. तर एकूण ९९९ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like