Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’चा तिसरा बळी, 60 वर्षीय महिलेचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील एका ६० वर्षाच्या महिलेचा कोरोनाने मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पुण्यातील या ६० वर्षाच्या महिलेच्या मृत मुलाचे नमुने तपासल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या महिलेला संशयावरुन  ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा नमुना निगेटिव्ह आल्याने तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर तिचा घरी मृत्यु झाला होता.

तिचा मृतदेह ससून रुग्णालयात आणला गेला. त्यानंतर तिचा ‘स्वाब’ घेऊन चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. तो पॉसिटिव्ह आला आहे. त्यामुळे या मधल्या काळात तिचा कोणाकोणाशी संपर्क आला याची माहिती घेतली जात आहे. पुण्यातील हा तिसरा बळी आहे. पुण्यात उपचार घेत असलेल्या दोन कोरोना बाधितांची प्रकृती अत्यस्वस्थ आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like