इराणमध्ये तिसऱ्यांदा भीषण स्फोट, लष्करी तळांवर इस्त्रायली हल्ल्याचा संशय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इराणची राजधानी तेहरानमध्ये पुन्हा एकदा दोन मोठे बॉम्बस्फोट झाले आहेत. शुक्रवारी सकाळी तेहरानमधील दोन इमारतींमध्ये जोरदार स्फोट झाला. या स्फोटानंतर शहरातील एका भागातील वीज गेली. जिथे स्फोट झाला त्या इमारतींमध्ये काय काम केले केले जात होते, याची कोणतीही ठोस माहिती नाही, परंतु हे इराणी सैन्याचे गुप्त अड्डे असल्याचे सांगण्यात येत आहे. इराणी माध्यमांच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यामागे इस्राईलचाच हात असू शकतो.

इराणी माध्यमांच्या म्हणण्यानुसार तेहरान भागात ज्या ठिकाणी स्फोटाचा आवाज ऐकू आला आहे, तेथे सैन्याचे अनेक गुप्त अड्डे आहेत. या स्फोटाचे लक्ष्य हेच सैन्य तळ असल्याचे सांगितले जात आहे. इराणचे सैन्य तज्ञ फबियान हिंज म्हणाले, या भागात इराणचे दोन अंडरग्राउंड केंद्रे आहेत. त्यातील एकात रासायनिक शस्त्रास्त्रांवर संशोधन केले जाते आणि दुसरे अज्ञात लष्करी उत्पादन केंद्र आहे. गेल्या तीन आठवड्यात इराणमधील हा तिसरा मोठा स्फोट आहे. यापूर्वी दोन स्फोट इराणचे मुख्य लष्कर आणि अणु तळ खोजीर येथे झाले होते. जेथे देशातील सर्वात मोठे क्षेपणास्त्र उत्पादन केंद्र आणि नतांज अणू तळ आहे. नतांजमध्ये हा हल्ला सेंट्रीफ्यूज असेंब्लीच्या इमारतीत झाला होता.

इस्रायल करतोय हल्ला
दरम्यान, इराणने खोजीरमध्ये झालेल्या स्फोटाला गॅस टँकमधील गळती असल्याचे सांगितले. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा अपघात नव्हता तर इस्त्रायली गुप्तचर संस्थांनी केलेला हल्ला होता. पाश्चात्य माध्यमांच्या माहितीनुसार, इराणने राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत नतांज अणू केंद्रात झालेल्या स्फोटाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पश्चिम आशियाई देशांच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाही विश्वास आहे की, नतांज अणू केंद्रावर झालेल्या हल्ल्यामागे इस्राईलचा हात होता.

इराणी सैन्याच्या सदस्याने सांगितले की, या हल्ल्यात स्फोटकांचाही वापर करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी, इराणने पुष्टी केली की, भूगर्भातील नतान्ज आण्विक साइटवरील नुकसान झालेली इमारत प्रत्यक्षात नवीन सेंट्रिफ्यूज केंद्र आहे. इराणची अधिकृत माहिती संस्था आयआरएनएने सांगितले आहे की, सेंट्रीफ्यूजेस अशी मशीन्स आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या घनतेचे द्रव्य किंवा घन पदार्थांपासून द्रव वेगळे करण्यासाठी सेंट्रिफ्यूजल फोर्सचा वापर होतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like