सांगली : मिरजेत तृतियपंथीयाचा खून, परिसरात खळबळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मिरजेतील शहर बस स्थानक जवळील एका कॉम्प्लेक्स मध्ये एका तृतीयपंथीयाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. गौस रज्जाक शेख उर्फ काजल (वय 35 रा.सिद्धार्थ वसाहत कुरणे वाड्यामागे, मिरज ) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

मृत काजल बस स्थानक परिसरात रात्री नेहमीच थांबत असे. मंगळवारीही ती नेहमीप्रमाणे तेथे थांबली होती. रात्री साडेबाराच्या सुमारास एकासोबत ती एका कॉम्प्लेक्स मध्ये गेली. तेथे त्या दोघांचा वाद झाला. नंतर संशयितांने काजलवर चाकूने हल्ला केला. त्यात काजल गम्भीर जखमी झाली. नंतर संशयित पसार झाला. काजलने फोन करून मैत्रनिला याची माहिती दिली. नंतर तिला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांना आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. या खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.