भाजपचा ‘दबदबा’ असणाऱ्या ‘या’ मतदार संघातून तृतीयपंथी निवडणूक लढणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मोठ्या पक्षांपासून ते लहान पक्षांपर्यंत सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून चक्क एक तृतीयपंथीय निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. तशी त्याने घोषणाही केली आहे.

तृतीयपंथी यांच्या हक्कासाठी जनहित लोकशाही पक्षाकडून तृतीयपंथी उमेदवार नताशा उर्फ नितीन लोखंडे हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले आहे. चिंचवड मतदारसंघामध्ये भाजपचे वर्चस्व आहे. या मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे नताशा लोखंडे याने सांगितले. तसेच समाजात तृतीयपंथी यांना हक्कासाठी झगडावे लागते. समाजातील ही स्थिती बदलण्यासाठी विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे नताशा लोखंडे यांनी सांगितले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघावर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे वर्चस्व आहे. जगताप तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्रीक करणार का याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. युती झाली नाहीतर शिवसेनेकडून राहुल कलाटे हे रिंगणात उतरतील. तसे झाले तर या मतदारसंघात चुरशीची लढत होऊ शकते. कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातच पक्षाला तगडा उमेदवार मिळत नाही.

You might also like