१६ जून पासून ‘या’ विम्याच्या प्रिमिअम दरामध्ये होणार वाढ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कार आणि दुचाकी साठी विमा घेताना आता काळजी घ्या. कारण जर तो थर्ड पार्टी विमा असेल तर तो तुम्हाला महागात पडू शकतो. कारण थर्ड पार्टी विमा १६ जून पासून महागणार आहे. वीमा नियंत्रण ‘इरडा’ (IRDA) ने वाहनांच्या काही श्रेणींवर अनिवार्य असलेला थर्ड पार्टी विम्याचा प्रीमियममध्ये २१ टक्क्यांनी वाढ केली आहे.

भारतीय विमा नियमक आणि विकास प्रधिकरणाने आपल्या आदेशात म्हणले आहे की १००० सीसी पेक्षा कमी क्षमता असलेल्या छोट्या चारचाकी साठी थर्ड पार्टी विम्याच्या प्रीमियम मध्ये १२ टक्क्यांनी वाढ होईल. यापुढे प्रीमियम १८५० रुपयांवरून वाढन २०७२ रुपये होणार आहे. त्याच प्रकारे १०००-१५०० सीसी च्या वाहनांचा विमा प्रीमियम १२.५ टक्के वाढल्याने ३२२१ रुपये होईल.

असे असले तरी १५०० हजार सीसी च्या पुढील वाहनांवरील थर्ड पार्टीच्या विम्याच्या प्रीमियममध्ये कोणती वाढ करण्यात आली नाही. तो प्रीमियम सध्या ७८९० रुपये एवढाच ठेवण्यात आला आहे. तर दुचाकी वाहनाच्या थर्ड पार्टी विम्यात देखील वाढ केली असून ७५ सीसी पेक्षा कमी क्षमता असलेल्या वाहनांवर थर्ड पार्टीचा प्रीमियम १२.८८ टक्क्याने वाढून ४८२ रुपये करण्यात आला आहे. तर ७५ ते १५० सीसी क्षमता असलेल्या वाहनाचा प्रीमियम ७५० रुपये केला आहे.

तर १५०-३५० सीसी क्षमता असलेल्या दुचाकींवर थर्ड पार्टी विम्याचा प्रीमियम सर्वात जास्त वाढवण्यात आला असून त्यांचा प्रीमियम ९८५ रुपयांनी वाढून ११९३ रुपये करण्यात आला आहे. असे असले तरी ३५५ सीसीच्या पुढील वाहनांवर कोणताही प्रकारचा प्रीमियम वाढवण्यात आलेला नाही.

Loading...
You might also like