Third Party Insurance Rate Hike | 1 जूनपासून वाहन मालकांना अधिक पैसे मोजावे लागणार; दुचाकी-चारचाकी वाहनांचा इन्शुरन्स वाढला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Third Party Insurance Rate Hike | वाहन मालकांसाठी एक महत्वाची माहीती समोर येत आहे. दुचाकी (Two-Wheeler) आणि चारचाकीसह (Four-Wheeler) सर्व गाड्यांचे थर्ड पार्टी मोटर (विमा) इन्शुरन्स प्रीमियम (Third Party Insurance Rate Hike) वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग विभागाच्या (Central Road Transport and Highways Department) माहितीनुसार वाहनांवरील इन्शुरन्स विमा 1 जूनपासून वाढ लागू होणार आहे. या निर्णयामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा इन्शुरन्स महाग होणार आहे.

 

एक हजार इंजिन सीसी (One Thousand Engine CC) क्षमता असणाऱ्या खासगी वाहनांचा प्रीमियम 2019 – 20 साली 2072 रुपयांवरून आता 2094 रुपये होणार आहे.
तसेच, 1 हजार ते दीड हजार सीसी इंजिन असलेल्या खासगी वाहनांना प्रीमियम 3,221 रुपये ऐवजी आता 3,416 रुपये भरावे लागतील.
तसेच, 1500 हून जादा सीसी खासगी वाहनांना थर्ड पार्टी विमा प्रीमियम मध्ये काहीशी घट केलीय.
7,897 वरून आता 7,890 रुपये भरावे लागणार आहेत. याचप्रकारे 150 ते 350 सीसी पर्यंत टुव्हिलर गाड्यांना 1,366 रुपये असतील.
तर 350 हून जादा सीसी दुचाकी वाहनांसाठी 2,804 रुपये मोजावे लागतील. असं मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. (Third Party Insurance Rate Hike)

प्रथमच थर्ड पार्टी दर निश्चित केली आहे. मंत्रालयाच्या अधिसूचनेनंतर हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांच्या (Hybrid Electric Vehicles) प्रीमियमवर 7.5 टक्के सूट देण्यात आलीय.
तसेच, 30 किलोव्हॅटहून जादा इलेक्ट्रीक खासगी वाहनांवरील प्रीमियम 1,780 रुपये असतील.
तसेच, 12 हजार ते 20 हजार किलो माल वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना वाहनांचे प्रीमियम 35,313 रुपये भरावे लागतील.
तर 40 हजाराहून जादा किलो मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रीमियम 44,242 रुपये भरावे लागतील,
30 किलोहून जादा व्हॅट प्रीमियम इलेक्ट्रिक वाहनांसाठी 2,904 रुपये द्यावे लागणार आहे. आता नवीन दर 1 जूनपासून लागू होतील.
या दरासंदर्भात भारतीय विमा नियामक (Insurance Regulator of India) आणि विकास प्राधिकरणाकडून (Development Authority) सूचना जारी करण्यात आली आहे.

 

Web Title :- Third Party Insurance Rate Hike | third party insurance rate hike new rates will be applicable from 1st june

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा