Third wave of Corona | नव्या संकटाची चाहूल? महाराष्ट्रातील 7 रूग्णांमध्ये आढळला ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’; एकाच जिल्ह्यातील 5 रूग्ण

मुंबई : महाराष्ट्राच्या तीन जिल्ह्यातून (रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर) मधून जमा केलेल्या नमून्यांमध्ये SARS-CoV-2 डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळले आहेत. हा व्हेरिएंट आणखी किती पसरला आहे, हे जाणून घेण्यासाठी आणखी नमूने तपासणीसाठी पाठवले आहेत. महाराष्ट्रात तज्ज्ञांनी डेल्टा-प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शंका व्यक्त केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात विशेषता कोल्हापुरसह सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये कोविड 19 च्या रूग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसत आहे.
डेल्टा प्लसच्या सातपैकी पाच रूग्ण एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात आढळले आहेत.

दोन रूग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत
रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या गावात पाच रूग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळला आहे, ते गाव पूर्णपणे लॉक करण्यात आले आहे आणि येथे कंटेंटमेंट झोन तयार केला आहे.
हैराण करणारी बाब म्हणजे या पाच रूग्णांपैकी दोघांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत.
आणखी एक बाब म्हणजे ज्या गावात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण आढळले, त्या गावातील लोकांचे नेहमी परदेशात येणे-जाणे सुरू असते.
परंतु या पाच रूग्णांनी परदेश प्रवास केला नसल्याचे म्हटले आहे.

10 जूनला रत्नागिरी जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 13.7 टक्के होता.
त्यावेळी राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5.8 टक्के होता.
रत्नागिरीत कोरोनाचे 6,553 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आढळले आहेत.

डेल्टा प्लस व्हेरिएंट म्हणजे काय, कसा तयार झाला?
डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta Plus Variant) डेल्टा व्हेरिएंटचे म्यूटेशन आहे. म्हणजे डेल्टा व्हेरिएंटच म्यूटेट होऊन डेल्टा प्लस व्हेरिएंट बनला आहे.
हा बी.1.617.2 स्ट्रेनच्या म्यूटेशनने बनला आहे.
म्यूटेशनचे नाव K417N आहे.
कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये म्हणजे जुन्या व्हेरिएंटमध्ये थोडे बदल होऊन नवीन व्हेरिएंट समोर आला आहे.

महाराष्ट्राच्या टास्क फोर्सने एक किंवा दोन आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शंका वर्तवली आहे. डेल्टा व्हेरिएंटने दुसर्‍या लाटेत मोठा विध्वंस केला, आता डेल्टा प्लस व्हेरिएंटने तिसरी लाट येण्याची शक्यता वाढवली आहे.

हे देखील वाचा

 

PM-Kisan | 10.34 कोटी शेतकर्‍यांना मिळाला पीएम किसानच्या आठव्या हप्त्याचा लाभ, लवकर करा रजिस्ट्रेशन

सरकारनं दिला इशारा ! नोकरीसाठी मिळाली असेल ऑफर तर व्हा सावध, होऊ शकतं मोठं नुकसान; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Third wave of Corona | threat in maharashtra as delta plus varient found in 7 patients in which 5 patients are from same district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update