Maharashtra Covid 3rd Wave : राज्यात जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची 3 री लाट?; CM उध्दव ठाकरेंनी दिले ‘हे’ आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने अनेकांना यामध्ये ओढले आहे. त्यानंतर आता कोरोनाची तिसरी लाट जुलै-ऑगस्टमध्ये येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित यंत्रणांना सज्ज होण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपे यांनी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी या लाटेचा सामना करण्यासाठी आपण आतापासूनच सज्ज व्हायला हवे, असे म्हटले आहे. तसेच ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने अनेक रुग्णालयांत आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यूही झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत.

याशिवाय राज्यात सध्या कोरोना संसर्गाची भीषण स्थिती पाहायला मिळत आहे. दिवसाला 60 ते 68 हजारांदरम्यान नव्या रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने अनेक रुग्णालयांत आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यूही झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन नसल्यास ऐकून घेतले जाणार नाही
कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी आपण आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे. प्रामुख्याने ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध असेल यासाठी नियोजन केले गेले पाहिजे. आपल्याकडे पुरेसा ऑक्सिजन नाही हे तिसऱ्या लाटेत ऐकून घेतले जाणार नाही, असा इशाराच मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत दिल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.