पैसेवाल्यांची हौस ! कुत्र्याला वाढदिवसानिमित्त घातला तेरा तोळ्यांचा गोफ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – एक तोळा सोन्याचा बाजारभाव ऐकला तरी सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ येते. घरात तोळाभर सोने आणायचे तर पोटाला चिमटा घ्यावा लागतो. आर्थिक कसरत करत सोने जमावावे लागते. मात्र, ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे. त्यांचे सुवर्णप्रेम विविध प्रकारे ओंगळवाण्या रूपात बऱ्याचदा दिसून येते. अशाच एका श्वानप्रेमी तरूणाने आपल्या लाडक्या श्वानाच्या वाढदिवसानिमित्त त्यास तब्बल तेरा तोळ्यांचा सोन्याचा गोफ घातल्याचा प्रकार नाशिकरोड येथे घडला आहे.

चेहेडी शिव येथील वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे श्वानप्रेमी रोहित राजपूत यांनी आपल्या सात वर्षांच्या भाऊ नामक श्वानाच्या वाढदिवसानिमित्त त्यास तब्बल तेरा तोळ्यांचा सोन्याचा गोफ घालून वाढदिवस साजरा केला.

चेहेडी शिव परिसरात राहणारे श्वानप्रेमी राजपूत यांना बालपणापासून श्वानांची आवड आहे. सात वर्षांपूर्वी त्यांना वाढदिवसाप्रसंगी मित्रांनी ग्रेट डेन जातीचे श्वानाचे पिलू भेट म्हणून दिले. पुढे त्याचा चांगला सांभाळ करत राजपूत यांनी त्यास मोठे केले. भेट दिलेल्या श्वानाचे रॉकी असे नामकरण केले. मात्र, या श्वानाला सर्वच भाऊ म्हणू लागले. रोहित यांनी वाढदिवशी लाडक्या श्वानास तेरा तोळ्यांचा गोफ तयार करून घातला. दरम्यान, या भाऊचा प्रत्येक वाढदिवस जगताप यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार उत्साहाने साजरा करतात. राजपूत यांच्या श्वानावरील आगळ्या वेगळ्या प्रेमाची परिसरात चांगलीच चर्चा सुरू आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us