13 वर्षीय भारतीय मुलीनं अनेक वेगवेगळ्या ‘भाषे’त गायलं ‘गाणं’, मिळाला ‘ग्लोबल’ पुरस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दुबईमध्ये एका तेरा वर्षीय भारतीय मुलीला एक संगीत समारंभात सर्वाधिक भाषांमध्ये सर्वात जास्त वेळ गाण्यासाठी 100 ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी अवार्ड प्रदान करण्यात आला. दुबईतील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार दुबईतील इंडियन हाईस्कूलची विद्यार्थिनी सुचेता सतीश 120 भाषांमध्ये गाऊ शकते.

सुचेता यावेळी म्हणाली, मला माझ्या दोन कौशल्यांनसाठी पुरस्कार देण्यात आले. एक मी एका कार्यक्रमात सर्वाधिक भाषांमध्ये गाणे गाऊन दाखवले म्हणून आणि दुसरे मी सर्वाधिक वेळ गाणे गायले म्हणून तसेच या आधी बारा वर्षाची असताना देखील हा रेकॉर्ड केला असल्याचे सुचेताने सांगितले. मात्र यावेळी पुरस्कार 102 भाषांमध्ये सलग सहा तास सर्वाधिक वेळ गायल्यामुळे देण्यात आल्याचे सुचेताने सांगितले.

या मुलीने मल्याळम सुपरस्टार मम्मूटी आणि अभिनेता उन्नी मुकुंदन यांच्या उपस्थितीत आपला दुसरा अल्बम या हबीबी लॉंच केला.

गायनासोबत शैक्षणिक अभ्यास चालू ठेवण्याविषयी विचारले असता सुचेता म्हणाली, मी दररोज रियाझ करण्याचा नियम बनविला आहे आणि देवाच्या कृपेने मी माझ्या अभ्यासावर परिणाम न करता हे करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार 100 ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी अवार्ड डॉ. अबुल कलाम इंटरनॅशनल फॉउंडेशन आणि ए आर रेहमान द्वारा मदत मिळालेला आहे. हा पुरस्कार अनेक श्रेणींमधील प्रतिभावान मुलांना दिला जातो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/