तळीरामांनो सावधान ! थर्टी फर्स्टला ड्रिंक अँड ड्राईव्हवर राहणार पोलिसांची करडी नजर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नववर्षाच्या स्वागतासाठी सध्या सगळीकडे सेलिब्रेशनचा मूड आहे. ख्रिसमसनंतर आता थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनची सध्या लगबग सुरु आहे. थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करतांना तरुण मंडळी मोठ्या उत्साहात दारू पिऊन सैरभैर गाड्या पळवतात. आणि नशेमध्ये अनेक अपघात होतात. याला लगाम लावण्यासाठी पोलिसांनी यांच्यावर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन तळीरामांचा थर्टी फर्स्ट फिवर उतरेपर्यंत शहरात कठोर कारवाईचा बडगा उचलला आहे.

शहरात उत्साहाचे वातावरण असल्याने त्यात तळीरामांमुळे बाधा येऊ नये म्हणून वाहतूक पोलीस सक्रिय झाले आहेत. वादविवाद, अपघाताच्या घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी तळीरामांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. काही हौशी लोक तर २५ तारखेपासूनच नविनवर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागतात. त्यामुळे २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान आणखी मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करून तळीरामांची झिंग आता पोलिसांमार्फत उतरविण्यात येणार आहे. नशेत वाहन चालवितांना आढळल्यास त्यांच्यावर वाहन कायदा १८५ नुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे. त्यासाठी ब्रेथ आनालायझरच्या साहाय्याने वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेकडे ३४ ब्रेथ आनालायझर मशीन उपलब्ध होत्या नवीन वर्षाच्या पार्शवभूमीवर आणखी मागणी केल्या प्रमाणे १०० मशिन्स वाहतूक शाखेला देण्यात आल्या आहेत.

यानुसार आत्तापर्यंत तब्बल ९ हजार ७५० बेशिस्थ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून पोलिसांनी जावपास ५० लाखांची दंडवसुली केली आहे.ही कारवाई मद्यपानकरून वाहन चालविणे,सिग्नल तोडणे, नोपार्किंगमध्ये वाहने लावणे, विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर करण्यात आली आहे. त्याचबरोबर विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याचा वेग वाहतूक पोलिसांनी वाढवला आहे. त्यामुळे यंदा थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करतांना जरा सावध राहणेच फायद्याचे ठरेल.