‘हे’ 6 अ‍ॅक्टर्स TV वर कृष्णाच्या रोलमध्ये खूपच ‘गाजले’, रातोरात झाले ‘स्टार’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्हीवर एकेकाळी मायथॉलॉजिकल शो खूप गाजले आहेत. राम, हनुमान, महादेव आणि कृष्णाचा रोल करून अनेक स्टार्स इतके पॉप्यलुर झाले की, लोक त्यांची खरंच पूजा करू लागले. टीव्हीवर अनेकांनी कृष्णाचा रोल केला आहे. परंतु नीतीश भारद्वाज, सौरभ राज जैन, सर्वदमन बनर्जी कृ्ष्णाच्या रोलमध्ये असे रमले की, लोकांच्या मनातून कधीच उतरणार नाहीत. एक नजर टाकूयात त्या अभिनेत्यांवर जे कृष्णाच्या रोलमध्ये खूप लोकप्रिय झाले.

1) नीतीश भारद्वाज – बी आर चोपडा यांचा हिट शो महाभारतमध्ये नीतीश भारद्वाज यांनी कृष्णाचा रोल केला होता. त्यांचा रोल इतका उठावदार होता की, लोक त्यांना पुजत होते. हा शो रवी चोपडाने डायरेक्ट केला होता.

2) स्वप्निल जोशी – रामानंद सागर यांची हिट सीरीयल श्री कृष्णमध्ये तरुण कृष्णाचा रोल अ‍ॅक्टर स्वप्निल जोशीने केला होता. त्यावेळी स्वप्निल 15 वर्षांचा होता. कृष्णाच्या रोलने स्वप्निल रातोरात स्टार झाला.

3) सर्वदमन डी बनर्जी – रामानंद सागर यांच्या श्री कृष्णमध्ये मालिकेत तरुण कृष्णाचा रोल स्वप्निल जोशीने केला होता. परंतु कृष्ण मोठा झाल्यानंतरचा रोल सर्वदमन डी बनर्जी यांनी केला होता. त्यांच्या मोहक स्माईल आणि डायलॉग्सने सर्वांचं मन जिंकलं.

4) सौरभ राज जैन – हा टीव्हीचा फेमस चेहरा आहे. त्यांनी अनेक ऐतिहासिक मालिकेत काम केले आहे. त्यांनी राम, महादेव, कृष्ण, विष्णु असे अनेक रोल केले आहेत. परंतु 2013 साली आलेल्या महाभारत या मालिकेने त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. यात त्यांनी कृष्णाचा रोल केला होता. हा शो हिट झाला होता.

5) निर्णय समधिया – परमावतार श्रीकृष्ण या मालिकेत बाल श्रीकृष्णाचा रोल निर्णय समधियाने साकारला होता. यातील गोलू मोलू आणि क्युट दिसणारा निर्णय प्रेक्षकांना इतका आवडला की तो प्रेक्षकांचा फेवरेट बनला.

6) धृती भाटीया – कलर्सवरील जय श्री कृष्ण या मालिकेतील छोट्या कृष्णाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये कृष्णाचा रोल लहानग्या धृती भाटीयाने केला होता. रामानंद सागर यांच्या श्री कृष्णचा रिमेक होता. रामानंद सागर यांचा मुलगा मोती सागर यांची हा शो केला होता.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like