‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बलात्काराच्या केसमध्ये फसलेला टिव्हि अभिनेता करण ओबरॉयला मुंबई हायकोर्टने जामीन मंजुर केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभिनेत्याने एका पीड़ित मुलीला लग्नाचे वचन देउन तिच्यावर बलात्कार केला होता. या गुन्ह्याबद्दल मुंबई हायकोर्टने ५० हजार रुपये घेऊन करणचा जामीन मंजुर केला आहे.

सध्या टिव्हि अभिनेता करण ऑबरॉयचे खूप वाईट दिवस आहे. या अभिनेत्यावर खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप लागला होता.या अभिनेत्याला नुकताच जामीन मिळाला आहे.त्यामुळे तो आता कारागृहातून बाहेर आला आहे.याबात करणने खुलासा केला आहे. आपल्यावर लावलेल्या आरोपांबद्दल करण म्हणाला की, ‘मी बलात्कार केला नाही व खंडणीही घेतली नाही. हा माझ्याविरोधात कट रचला जात आहे. मी मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो आणि एका रिलेशनमध्ये जे होते ते आमच्यामध्ये झाले. मी कोणालाच नशेचे औषध देऊन त्यांचा प्रायव्हेट व्हिडिओ काढला नाही. हा सगळा प्रकार मला फसविण्यासाठी कोणीतरी करत आहे.’

करण पुढे म्हणाला की, ‘मी किती खरा आहे हे यावरुनच कळते. कारण ज्यावेळी माझ्यावर हे आरोप लावले गेले तेव्हा मी माझा मोबाईल पोलीसांकडे सबमिट केला होता पण त्या महिलेचा मोबाईल त्यावेळी घेतला ज्यावेळी उच्च न्यायालयाने माझी बाजू ऐकली.पोलीस फक्त चॅटच्या आधारावर कसे काय कोणालाही अटक करु शकतात. मला विचार करुन फसविण्याचा कट आहे. मी कधीच पैशांसाठी कोणाला ब्लॅकमेल केले नाही.’

आरोग्यविषयक वृत्त

आहाराकडे लक्ष दिलेत तर मुले राहतील निरोगी

पावसाळ्यातील व्हायरल फीव्हरपासून असा करा बचाव

आरोग्यासाठी मुलांना द्यावे ‘एग सलाद’, होतील ‘हे’ फायदे

३ मिनिटात जाणून घ्या तुमचे हृदय किती तरुण आणि हेल्दी

Loading...
You might also like